UMANG App Ration Card: शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड हा प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याच्या मदतीने नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, जसे की स्वस्त दरात धान्य, गॅस कनेक्शन किंवा इतर अनुदान. अनेक वेळा लोकांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन रांगा लावाव्या लागतात. पण आता ही त्रासदायक प्रक्रिया टाळून तुम्ही घरबसल्या मोबाईलवरूनच नवे रेशन कार्ड काढू शकता.
आज आपण उमंग (UMANG) अॅपच्या मदतीने नवे रेशन कार्ड अर्ज करण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते.
रेशन कार्ड का महत्त्वाचे?
रेशन कार्ड हा केवळ अन्नधान्य घेण्याचा पास नसून, तो पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरला जातो. बँक खाते उघडणे, शिष्यवृत्ती मिळवणे, सरकारी योजना अर्ज करणे यासाठी रेशन कार्ड उपयुक्त ठरते. यात कुटुंबातील सदस्यांची नावे, पत्ता आणि अन्य माहिती नोंदलेली असते.
हेही वाचा: SIP Investment Tips: SIP करताय? 'या' 4 चुका तुमचा नफा खाऊन टाकतात; जाणून घ्या
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे
मोबाईलवरून रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा –
-
कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
-
पत्त्याचा पुरावा (वीज बिल, पाणी बिल किंवा इतर अधिकृत दस्तऐवज)
-
पासपोर्ट साइज फोटो
-
उत्पन्नाचा दाखला
-
पॅन कार्ड (असल्यास)
-
आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
उमंग अॅपद्वारे रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा?
-
उमंग अॅप डाउनलोड करा : आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमधून UMANG अॅप इंस्टॉल करा.
-
नोंदणी करा : अॅप उघडा आणि आपला मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे व्हेरिफाय करा.
-
होमपेजवर जा : अॅपच्या मुख्य पानावर "Services" विभाग निवडा.
-
युटिलिटी सर्व्हिसेस शोधा : येथे "Apply Ration Card" असा पर्याय निवडा.
-
राज्य निवडा : अर्ज करण्यासाठी तुमचे राज्य निवडा.
-
तपशील भरा :नाव, वडिलांचे/पतीचे नाव, जन्मतारीख, पत्ता अशी माहिती भरा.
-
कागदपत्रे अपलोड करा : आवश्यक दस्तऐवजांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
-
सबमिट करा : सर्व माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
सध्या उमंग अॅपद्वारे रेशन कार्ड अर्ज करण्याची सुविधा काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपुरती मर्यादित आहे, जसे की चंदीगड, लडाख, दादरा आणि नगर हवेली. इतर राज्यांसाठीही ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे.
आता रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत उभे राहण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स आणि आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या नवे रेशन कार्ड काढू शकता. डिजिटल भारत मोहिमेअंतर्गत ही सुविधा नागरिकांच्या वेळ आणि श्रमाची बचत करणारी ठरत आहे.