Rain Nakshatra Update: तुम्ही तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, सासू-सुनांचा पाऊस असे शब्द ऐकले असतील. एकूण 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रे पावसाची असतात. यापैकी वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये पडणाऱ्या पावसानुसार या पावसाची चक्क नावे पडलेली आहेत. तसेच, या नक्षत्रांची वेगवेगळी वाहनेही असतात. या वाहनानुसारही पाऊस किती पडेल, याचा अंदाज बांधला जातो.
मघा नक्षत्रातील पाऊस आणि त्या नक्षत्राचे वाहन हे पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषिविषयक लोककथांचा एक भाग आहे. यानुसार, प्रत्येक नक्षत्राचे एक विशिष्ट वाहन असते. सासूंचा पाऊस काही ठिकाणी जोरदार पडतो.
नक्षत्र बदलल्यानंतर पावसाच्या प्रमाणात बदल होतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. पंचांगानुसार 16 ऑगस्टच्या रात्रीपासून मघा नक्षत्र लागले असून पावसाचे वाहन बेडूक आहे. बेडूक वाहन असल्यास पाऊस जास्त पडतो, अशी ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे. त्यातच सध्या आसळका (आश्लेषा नक्षत्रातील पाऊस) संपून आता सासूचा पाऊस सुरू झाला आहे. सासूबाईंचा पाऊस काही ठिकाणी जोरदार पडतो. सध्या सर्व महाराष्ट्रात याच नक्षत्रातील पावसाचा अनुभव येत आहे. या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये चिंतेचं वातावरण बनलं आहे.
हेही वाचा - Gurupushyamut Yog : खरेदीसाठी उत्तम मुहुर्त! सोन्यासह अन्यही अनेक वस्तू घेण्यासाठी चांगली संधी
मघा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सासूचा पाऊस -
घा नक्षत्रातील पावसाला 'सासूचा पाऊस' असेही म्हणतात. या शब्दप्रयोगाचा अर्थ असा आहे की, सासू जशी काहीवेळा खूप प्रेमळ असते आणि काहीवेळा कडक होते, त्याचप्रमाणे या नक्षत्रात पाऊस काही भागात खूप मुसळधार पडतो, तर काही ठिकाणी सौम्य स्वरूपात पडतो.
अचानकपणे जोरदार पाऊस
काही ठिकाणी असाही समज आहे की, मघा नक्षत्रात अचानक जोरदार पाऊस येतो आणि तो थोड्याच वेळात थांबतो. या नक्षत्रात पाऊस इतका सातत्याने किंवा अचानक पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही. मघा नक्षत्राचे वाहन बेडूक असल्यानं या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा केली जात होती. तशाच पद्धतीने सध्या तो अनुभवाला येत आहे.
पण, हा पाऊस सर्व ठिकाणी सारखा नसतो, तो काही ठिकाणी मुसळधार असतो तर काही ठिकाणी थोडा-थोडा पडतो. म्हणूनच, या नक्षत्रातील 'सासूबाईंचा पाऊस' हा अनपेक्षित आणि कधीकधी जोरदार असतो.
भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषी परंपरेनुसार, पावसाची नऊ प्रमुख नक्षत्रे आहेत आणि त्यातील प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. काही नक्षत्रात जास्त पाऊस पडतो. ही नक्षत्रे विशेषतः जोरदार पावसासाठी ओळखली जातात.
हेही वाचा - Pitru Paksha 2025: पितृ पक्ष कधी सुरू होईल? सर्व तिथी आणि पूजा पद्धती, जाणून घ्या..
पावसाची नक्षत्रे - पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी चार नक्षत्रे अधिक महत्त्वाची मानली जातात. ती कोणती आहेत, आणि त्यांची काय खासियत आहे, ते जाणून घेऊ.
आर्द्रा नक्षत्र : हे नक्षत्र पावसाच्या निश्चित आगमनासाठी ओळखले जाते. आर्द्रा नक्षत्रात पाऊस पडला तरच पेरणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने होते. भारतीय किंवा खासकरून महाराष्ट्रातील हवामानानुसार पेरणीची हीच योग्य वेळ असते. या नक्षत्रात अनेकदा मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होतो.
पुनर्वसू नक्षत्र : या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस असेही म्हणतात. पुनर्वसू नक्षत्रात पाऊस चांगला आणि सातत्यपूर्ण पडतो, ज्यामुळे पिकांना योग्य वाढीसाठी मदत होते.
मघा नक्षत्र : या नक्षत्राला सासवांचा पाऊस असे म्हणतात, कारण तो अचानक आणि जोरदारपणे येतो. काही ठिकाणी या नक्षत्रात मुसळधार पाऊस पडतो, तर काही ठिकाणी तो कमी असतो.
हस्त नक्षत्र : हे नक्षत्र परतीच्या पावसासाठी ओळखले जाते. या पावसाला 'हस्ताचा पाऊस' असे म्हणतात. रब्बी पिकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)