Indian Employee Resigns from Toxic Work place : रेडिटमधील एका महिला युजरने पोस्टमध्ये सांगितले की, तिने कंपनीत चार वर्षे ओव्हरटाईम, प्रशिक्षण आणि कमी पगारावर काम केले. पण जेव्हा तिच्या भावाच्या लग्नाला जाण्याचा प्रश्न आला तेव्हा कंपनीतील बॉसने सुट्टी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने या महिला कर्मचाऱ्याला नोकरी किंवा भावाच्या लग्नासाठी सुट्टी यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले. या प्रकारामुळे या महिला कर्मचाऱ्याला भावनिक धक्का बसला आणि तिचा आत्मसन्मानही दुखावला गेला. यानंतर या महिलेने पुढे काय घडले, तिने कोणता निर्णय घेतला याविषयी या पोस्टमध्ये सांगितले आहे.
या भारतीय कर्मचाऱ्याने रेडिटवर सांगितले की, तिच्या कंपनीने तिला तिच्या भावाच्या लग्नाला अमेरिकेत उपस्थित राहण्यासाठी राजीनामा देऊन कायमची सुट्टी किंवा नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगितले. भारतीय कर्मचाऱ्याने रेडिटवर याबाबतची धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, तिच्या कंपनीने तिला स्पष्टपणे सांगितले की एकतर रजा न घेता काम करा किंवा कायमची सुट्टी घेऊन भावाच्या लग्नात अमेरिकेत जा.. म्हणजेच, नोकरी सोडा.
'चार वर्षे कंपनीसाठी ओव्हरटाईम काम केले, नवीन लोकांना प्रशिक्षण दिले आणि कठीण काळात कमी पगारातही काम करत राहिले. तरीही जेव्हा कुटुंबाचा सर्वात मोठा दिवस आला तेव्हा कंपनीने सहानुभूती दाखवण्यास नकार दिला. ही कहाणी आता ऑनलाइन चर्चेचा एक मोठा विषय बनली आहे - काम आयुष्यापेक्षा मोठे असू शकते का?' असे या महिलेने रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - Bengaluru Auto driver Emotional Video : चिमुकल्या काळजाच्या तुकड्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवणाऱ्या पित्याचा Video Viral
महिलेची पोस्ट व्हायरल झाली
या महिलेने रेडिटवर याबद्दल एक पोस्ट पोस्ट केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, माझं काही चुकलं आहे का? भावाचे लग्न किंवा नोकरी यापैकी एकाची निवड... आणि माझा निर्णय. नमस्कार मित्रांनो, मला तुमचे मत हवे आहे. मी गेल्या 4 वर्षांपासून माझ्या कंपनीत काम करत आहे. या काळात मी खूप मेहनत घेतली. नवीन लोकांना प्रशिक्षण दिले आणि नेहमीच कंपनीला प्राधान्य दिले. पण अलीकडेच माझ्या सख्या भावाचे लग्न ठरले. आयुष्यात ही घटना एकदाच घडणार होती. मी कंपनीला 3 आठवडे आधीच सांगितले होते की, मला अमेरिकेला जाण्यासाठी 15 दिवसांची रजा हवी आहे.
कंपनीच्या वाईट काळातही कंपनीला पाठिंबा दिला
महिलेने पुढे सांगितले की, कंपनीकडून हे अपेक्षित नव्हते; परंतु, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की एकतर लग्नाला जाण्यासाठी नोकरी सोडा किंवा सुट्टी न घेता काम करत रहा. मी रजा कमी करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी मान्य करण्यास नकार दिला. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे, मी 4 वर्षे त्यांच्या प्रत्येक गरजेनुसार स्वतःच्या आयुष्याशी तडजोड केली. जेव्हा कंपनी अडचणीत होती, तेव्हा मी कमी पगारावरही काम केले. जेव्हा दोन लोक नोकरी सोडून गेले, तेव्हा मी कोणतेही अतिरिक्त पगार न घेता त्यांचे सर्व काम हाती घेतले. असे असूनही, मला थोडीशीही सहानुभूती दाखवण्यात आली नाही.
विशेष म्हणजे, कंपनीतील जवळजवळ प्रत्येकजण, अगदी माझे जुने बॉससुद्धा (ज्यांना मी आधी रिपोर्ट करायचे), कंपनीचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे म्हणत आहेत आणि हे सर्वजण मला पाठिंबा देत आहेत. शेवटी, माझ्याकडे कोणतीही नवीन ऑफर नसताना मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने, माझ्यावर कोणताही मोठा आर्थिक भार नाही (जसे की भाडे किंवा जेवणाचा खर्च). पण मनात प्रश्न असा आहे की, मी योग्य काम केले का? कुटुंबाची निवड करून आणि कंपनी सोडून मी योग्य निर्णय घेतला का, ज्यांनी माझ्या गरजेच्या वेळी मला साथ दिली नाही?
हेही वाचा - Weight Loss Bonus Reward : वजन कमी करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 1.2 कोटींचा बोनस
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट
ही पोस्ट रेडिटवर वेगाने व्हायरल झाली. लोकांनी या महिला कर्मचाऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि कंपनीच्या वृत्तीवर कठोर टीका केली. एका वापरकर्त्याने लिहिले - माझे गुरु नेहमीच म्हणायचे की, प्रथम तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्या, नोकरी त्यानुसार जुळवून घ्यावी, उलट नाही. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले - मी संपूर्ण पोस्ट वाचली नाही, फक्त शीर्षक पुरेसे आहे. तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले - हे आम्हाला एक मोठा धडा शिकवते - जर तुम्ही एकदा सहजपणे तडजोड केली तर कंपनी तुम्हाला नेहमीच कमकुवत मानेल.