Sunday, August 31, 2025 04:04:53 PM

महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण

महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण उडाली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.

महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण

मुंबई : महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण उडाली. महायुतीने विधानसभा निवडणुकीत 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. या उलट मविआ विधानसभेच्या 288 पैकी 45 जागांवरच विजय मिळवू शकली किंवा आघाडी घेऊ शकली. मविआत ठाकरे सेनेने 20, काँग्रेसने 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. इतर बारा जागांवर विजयी झाले किंवा आघाडी घेऊ शकले. राज ठाकरेंच्या मनसेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. 

विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यांची प्रभावी अंमलबजावणी महायुतीसाठी लाभदायी ठरली. तर व्होट जिहाद आणि आरक्षणाचे राजकारण याचा फायदा होईल या आशेवर राहिलेली मविआ तोंडावर आपटली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.     

भारतीय जनता पार्टी 100 जागांवर विजयी आणि 33 जागांवर आघाडीवर
शिवसेना 47 जागांवर विजयी आणि 10 दहा जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस 37 जागांवर विजयी आणि 4 जागांवर आघाडीवर  
महायुतीत भाजपाने 133, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. 
महायुतीने विधानसभा निवडणुकीत 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली.


सम्बन्धित सामग्री