Thursday, August 21, 2025 02:14:35 AM

तिसरी मुलगी झाल्याने पतीने पत्नीला जिवंत पेटवलं; पाहा नेमकं काय झालं?

परभणी जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तिसरी मुलगी झाल्याने पतीने पत्नीला जिवंत पेटवलं पाहा नेमकं काय झालं

परभणी : परभणी जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पत्नीला जिवंत पेटवलं असल्याची घटना घडली आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी महिलेची धावाधाव केली. यावेळी घरांसह दोन दुकाने जळून खाक झाली.

तिसरीसुद्धा मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळले. जीव वाचविण्यासाठी पत्नीने धाव घेतली. मात्र यावेळी धावताना घरासह दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दोन मुलींच्या पाठी तिसरीही मुलगीच झाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीवर डाव धरला. उटता बसता पत्नीला शिवीगाळ मारहाण करून पती तिच्याशी भांडायचा. गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान पतीने कहरच केला. टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून चक्क पेटवून दिले. मैना कुंडलिक काळे असे या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पत्नीला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

हेही वाचा : Beed Murder Case: बीडमधील मोर्चातून जरांगेंचा सरकारवर निशाणा

 

दरम्यान मृत महिला मैना काळे या पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर पडताना आणि दुकानात शिरतानाचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. एवढ्या क्रूरपणे आपल्या पत्नीचा जीव घेणाऱ्या कुंडलिक काळेविषयी सध्या प्रचंड मनस्ताप व्यक्त केला जात आहे. तिसरी मुलगी झाल्याने संतापलेल्या पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळले होते. यानंतर पोलिसांनी शोध घेत अखेर आरोपीला ताब्यात घेतले आहे. परभणी पोलिसांकडून कुंडलिक काळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री