Bigg Boss 19: सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 19 आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, पहिल्याच भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या या शोच्या ग्रँड प्रीमियरच्या रात्री, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आहे. मात्र, हा विजेता शोचा अंतिम विजेता नसून, बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवणारा पहिला सदस्य आहे.
यंदा निर्मात्यांनी शोमध्ये अनोखा बदल केला आहे. बिग बॉस 19 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रेक्षकांवरच निर्णय सोपवला गेला. यासाठी दोन स्पर्धकांची निवड झाली, युट्यूबर मृदुल तिवारी आणि अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा. या दोघांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रेक्षकांनी निर्णायक भूमिका बजावली. शेवटी, मृदुल तिवारीने शहबाजला हरवत बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा प्रवेश केला.
हेही वाचा - Amitabh Bachchan: ना जया, ना अभिषेक... चित्रपट निवडताना अमिताभ बच्चन घेतात 'या' व्यक्तीचा सल्ला
या अनोख्या पद्धतीमुळे प्रेक्षकांना प्रीमियरच्या रात्रीच विजेत्याची घोषणा पाहायला मिळाली. तथापि, हा केवळ पहिला टप्पा आहे. बिग बॉस सीझन 19 चा खरा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी 5 महिन्यांची प्रतिक्षा करावी लागेल. यावेळी हा शो नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना अधिक ड्रामा, टास्क्स आणि मनोरंजनाचा डोस मिळणार आहे.
हेही वाचा - Govinda and Sunita Ahuja : व्यभिचार, क्रूरता, फसवणूक; गोविंदावर गंभीर आरोप करत सुनीतानं केला घटस्फोटासाठी अर्ज दाखल
बिग बॉस 19 स्पर्धकांची यादी -
गौरव खन्ना, मृदुल तिवारी, अमाल मलिक, अवेज दरबार, तान्या मित्तल, अतुल किशन, कुनिका सदानंद, प्रणित मोरे, नीलम गिरी, झीशान कादरी, बसीर अली, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, नगमा मिराजकर, अशनूर कौर आणि नतालिया जानोस्झेक हे या सीझनमध्ये स्पर्धा रंगवणार आहेत. यंदा बिग बॉस 19 चा प्रवास खूपच रंगतदार आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला असणार आहे.