Monday, September 01, 2025 10:20:54 AM

नवरात्रीत येणार भाजपाची पहिली यादी

विधानसभेसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहुर्तावर...

नवरात्रीत येणार भाजपाची पहिली यादी

मुंबई : महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभेसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात झाली होती. यामुळे २०२४ मध्येही राज्यात विधानसभेसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहुर्तावर जाहीर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या यादीत कोणाचा समावेश असेल आणि कोणाची नावं वगळली जातील यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 


सम्बन्धित सामग्री