Sunday, August 31, 2025 01:46:12 PM

राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष

राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.

राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष


मुंबई : आतापर्यंत हाती आलेले कल बघता राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार भाजपाने 110 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपा 2019 च्या निवडणुकीत 105 जागांवर विजयी झाली होती. यावेळी भाजपा 2019 ची कामगिरी मागे टाकणार असे दिसत आहे. 

ताज्या आकडेवारीनुसार भाजपा 110 पेक्षा जास्त जागांवर आणि भाजपाच्या नेतृत्वातील महायुती 211 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. विकासाचा पॅटर्न भाजपाला लाभदायी ठरल्याचे चित्र आहे. भाजपाचे उमेदवार आघाडीवर असताना मविआचे अनेक प्रमुख पिछाडीवर पडले आहेत. 

ताजी अपडेट

महायुती 211 जागांवर आघाडीवर
भारतीय जनता पार्टी (भाजपा) 121 जागांवर आघाडीवर
शिवसेना 56 जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर

देवेंद्र फडणवीस आघाडीवर 


सम्बन्धित सामग्री