नवी दिल्ली : अमेरिका आणि भारतादरम्यानचा ऊर्जा व्यापार वाढत आहे. याला फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेशी देखील जोडले जात आहे. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार असमतोल दुरुस्त करण्यावर भर दिला होता.
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे. एप्रिल 2025 मध्ये, संयुक्त अरब अमिराती (UAE) ला मागे टाकत अमेरिका भारताचा चौथा सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार बनला. या क्रमवारीत कोण-कोण आहे, ते पाहूया.
एनर्जी कार्गो ट्रॅकिंग फर्म व्होर्टेक्साच्या आकडेवारीनुसार, भारताची अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी गेल्या वर्षीच्या 0.17 एमबीडीवरून दुप्पट होऊन 0.33 दशलक्ष बॅरल प्रतिदिन (एमबीडी - mbd) झाली आहे.
हेही वाचा - Gold Price : अमेरिका-चीनमुळे सोन्याचे भाव घसरले; 10 ग्रॅमची किंमत 85 हजारांपर्यंत जाऊ शकते का?
ट्रम्प-मोदी चर्चेनंतर बदल
या वाढत्या ऊर्जा व्यापाराला फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेशी देखील जोडले जात आहे. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार असमतोल दुरुस्त करण्यावर भर दिला होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी असेही संकेत दिले होते की, भारताची अमेरिकेकडून ऊर्जा खरेदी 15 अब्ज ते 25 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते.
आता रशिया भारताला सर्वाधिक तेल देतो
अमेरिकेची उपस्थिती वाढत असली तरी, भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार अजूनही रशिया आहे, ज्याचा एप्रिलमध्ये 37.8 टक्के वाटा होता. त्यानंतर इराक (19.1 टक्के), सौदी अरेबिया (10.4 टक्के) आणि आता अमेरिका (7.3 टक्के) आहे. युएईचा वाटा मागील चौथ्या स्थानावरून 6.4 टक्क्यांवर घसरला आहे. एका अहवालानुसार, मार्चमध्ये युएईमधून मोठ्या प्रमाणात शिपमेंट झाल्यानंतर एप्रिलमध्ये पुरवठा थोडा कमी राहिला.
भारतात अमेरिकन तेल का वाढले? यामागील कारण जाणून घ्या
खरं तर, अमेरिकेतून भारतात तेल निर्यात वाढली. कारण अमेरिकेतून युरोपला होणारी निर्यात कमी झाली आहे. युरोप आता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या हलक्या तेलाच्या पर्यायांकडे पाहत आहे आणि तेथील काही रिफायनरीज देखील बंद करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम असा झाला की, अमेरिकेने आपले लक्ष आशियाकडे, विशेषतः भारताकडे वळवले. एप्रिलमध्ये, भारताने अमेरिकेच्या एकूण तेल निर्यातीपैकी सुमारे 8 टक्के तेल खरेदी केले.
सौदी आणि युएई मागे का आहेत?
सौदी अरेबिया आणि युएई सारख्या जुन्या पुरवठादारांची घसरण त्यांच्या धोरणात्मक शिपमेंट धोरणांमुळे आहे. मार्चमध्ये युएईने जास्त तेल पाठवले होते, त्यामुळे एप्रिलमध्ये थोडीशी घट झाली. याशिवाय, सौदी अरेबिया सध्या पूर्व आशिया आणि युरोपमध्ये आपला वाटा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, सौदी अरेबियातून पुरवठा लवकरच परत पूर्ववत होऊ शकतो. OPEC+ गट (ज्यामध्ये सौदी आणि रशिया सारखे 23 देश समाविष्ट आहेत) मे आणि जूनमध्ये दररोज अतिरिक्त 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखत आहे. यातील सर्वात मोठा भाग सौदी अरेबियातून येण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर चिनी कंपन्यांना मोठे नुकसान; अब्जावधींचे शेअर्स कोसळले