मुंबई : सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मेल- एक्सप्रेसला जनरल क्लासचे दोन कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. आतापर्यत मध्य रेल्वेने जनरल क्लासचे १५० कोच विविध गाड्यांना जोडले असून या वर्षअखेरपर्यत सर्व गाड्यांना जनरल क्लासचे दोन कोच जोडण्याचे नियोजन केले आहे. या जनरल कोचचा सर्वाधिक फायदा यूपी-बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.