मध्य रेल्वेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ–बदलापूर दरम्यान मालगाडी इंजिन बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा मात्र ठप्प झाली असून याचा फटका कामावर निघालेल्या अनेक नोकरदारांना बसला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजताच्या सुमारास अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडलं आणि त्यामुळे मागोमाग येणाऱ्या लोकलही अडकून पडल्या आणि वाहतूक ठप्प झाली.दरम्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे.
हेही वाचा - Manoj Jarange Patil Protest In Mumbai : टेम्पो, ट्रक आणि राशन... मराठा आंदोलकांची तयारी कशी? जाणून घ्या
संपूर्ण रेल्वे सेवा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो, तोपर्यंत गर्दीचा रेटा वाढण्याची शक्यता आहे. दररोजच्या प्रवासावर परिणाम झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.