Wednesday, August 20, 2025 10:27:57 PM

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

महाराष्ट्र: महाराष्ट्रात अवकाळीचा तडाखा पाहायला मिळत आहे. फेंगाल चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह ग्रामीण भागात अवकाळीचा मोठा परिमाण दिसत असून शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर, नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच आता आज पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. 

फेंगाल चक्रीवादळाचा हवामानावर काय परिणाम? 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गारठा वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान हे १० अंशाच्या खाली गेले होते. मात्र आता फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

फेंगाल चक्रीवादळामुळे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात आज पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने आज १० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 


सम्बन्धित सामग्री