Thursday, August 21, 2025 02:16:55 AM

मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून हजारो शिवसैनिकांना आवाहन केले.

मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हजारो शिवसैनिक आज सकाळी सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी येणार होते. अशातच एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही  एकत्र येऊ नये असे आवाहन ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

एकनाथ शिंदेंचे ट्विट

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.

 

महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेसाठी लगबग सुरू झाली आहे. महायुतीमधील नवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. एकीकडे महायुतीत भाजपाला सर्वात जास्त बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री असावा असे भाजपा कार्यकर्त्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांचे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटच्या माध्यमातून शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केल्याचे पाहायला मिळते आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावेत असे हजारो शिवसैनिकांना वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल. याचा पेच वाढतच चालला आहे.  


सम्बन्धित सामग्री