Sunday, August 31, 2025 06:31:11 AM

CISF Bharti 2025: 1,100 हून अधिक पदांसाठी सुवर्णसंधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती!

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी 1,161 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

cisf bharti 2025 1100 हून अधिक पदांसाठी सुवर्णसंधी दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती

सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदासाठी 1,161 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 5 मार्च ते 3 एप्रिल 2025 या कालावधीत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

हेही वाचा :होळीपूर्वी महायुती सरकारचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! महागाई भत्त्यात 12 टक्के वाढ

रिक्त पदांचा तपशील:

CISF मध्ये ट्रेड्समन कॉन्स्टेबल पदासाठी विविध ट्रेडमध्ये भरती केली जात आहे. जागांची विभागणी पुढीलप्रमाणे आहे:
    •    कॉन्स्टेबल कुक – 493
    •    कॉन्स्टेबल चांभार – 09
    •    कॉन्स्टेबल टेलर – 23
    •    कॉन्स्टेबल नाई – 199
    •    कॉन्स्टेबल धोबी – 262
    •    कॉन्स्टेबल सफाई कामगार – 152
    •    कॉन्स्टेबल पेंटर – 02
    •    कॉन्स्टेबल सुतार – 09
    •    कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन – 04
    •    कॉन्स्टेबल माळी – 04
    •    कॉन्स्टेबल वेल्डर – 01
    •    कॉन्स्टेबल चार्जमन (मेकॅनिकल) – 01
    •    कॉन्स्टेबल MP अटेंडंट – 02

पात्रता व वयोमर्यादा:
    •    शैक्षणिक पात्रता: उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
    •    वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 28 वर्षे असावी. राखीव प्रवर्गासाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

हेही वाचा : PM Kisan 19th Installment Status: पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की, नाही? 'असं' करा चेक

निवड प्रक्रिया व पगार:

उमेदवारांची निवड पाच टप्प्यांत केली जाईल:
    1.    शारीरिक दक्षता चाचणी (PET)
    2.    शारीरिक मानदंड चाचणी (PST)
    3.    कागदपत्रांची तपासणी
    4.    लेखी परीक्षा
    5.    वैद्यकीय तपासणी

पगार: निवड झालेल्या उमेदवारांना रु. 21,700 ते रु. 69,100 दरम्यान मासिक वेतन मिळेल.

अर्ज फी:
    •    सामान्य, ओबीसी व EWS उमेदवार: रु. 100
    •    SC/ST व महिला उमेदवार: अर्ज फी नाही

उंची मर्यादा:
    •    पुरुष उमेदवार: 170 सेमी
    •    महिला उमेदवार: 157 सेमी

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी दवडू नका!


सम्बन्धित सामग्री