Sunday, August 31, 2025 10:53:16 PM

'या' जिल्ह्यात नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रामनगर गावातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.

या जिल्ह्यात नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाचं रांगा लागल्या आहेत. एका बाजूला मतदानासाठीचे गर्दीचे चित्र असताना दुसऱ्या बाजूला काही मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही. ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड  तालुक्यामधील रामनगर गावात एकही मतदान न झाल्याचे चित्र आहे. रामनगर गावातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.    


सम्बन्धित सामग्री