Sunday, August 31, 2025 11:49:51 PM

सर्पदंशावर मंत्रतंत्र खरंच उपयोगी पडतात? या उपायाने जीव वाचतो? सत्य जाणून आश्चर्य वाटेल

शक्यतो साप त्याला काही धोका जाणवल्यावरच चावतो. सर्पदंशापासून वाचण्यासाठी शेतात फिरताना किंवा जंगलभ्रमंती करताना सावध राहणं आवश्यक आहे. लहान मुलांनाही या धोक्याबाबत माहिती देणं आवश्यक आहे.

सर्पदंशावर मंत्रतंत्र खरंच उपयोगी पडतात या उपायाने जीव वाचतो सत्य जाणून आश्चर्य वाटेल

Facts About Snake Bite : सापाचं नाव ऐकलं की बहुतेकांना भीती वाटू लागते. साप दिसला तर सर्वच जण चार हात दूरच राहणं पसंत करतात आणि हे योग्यही आहे. साप चावल्यानं मृत्यू होतो, एवढंच आपल्याला ठावूक असतं. त्यामुळेच लोकांमध्ये घाबरण्याचं प्रमाण जास्त आहे. नकळतपणे आपण सापाच्या आसपास गेलो किंवा साप जवळ आल्याचं लक्षात आलं नाही तर, सर्पदंश होण्याची शक्यता असते.

शक्यतो साप त्याला काही धोका जाणवल्यावरच चावतो. आपल्या अनवधानाने झालेल्या हालचालींमधून त्याला धोका जाणवण्याची शक्यता असते. तेव्हा, सर्पदंशापासून वाचण्यासाठी शेतात फिरताना किंवा जंगलभ्रमंती करताना सावध राहणं आवश्यक आहे. तसंच, आपल्या परिसरात गवत, तण माजू न देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण, घराच्या, शाळांच्या आजूबाजूला लहान मुलेही खेळत असतात. शिवाय, मुलांनाही या धोक्याबाबत माहिती देणं आवश्यक आहे.

हेही वाचा - उन्हाळ्यात कुंडीतली रोपं सुकतायत? कांद्याच्या सालीचा असा करा वापर, हिरवीगार छान होतील

प्रत्यक्षात साप चावला तर मात्र, तातडीने डॉक्टरांकडे जाणेच योग्य ठरते. तसेच, शक्य असल्यास तो साप दिसायला कशा प्रकारचा होता, हेही लक्षात ठेवावे. त्याचे वर्णन डॉक्टरांना सांगावे. तसेच, सर्पदंशानंतर जाणवणाऱ्या लक्षणांची पूर्ण माहिती द्यावी. काही ठिकाणी ग्रामीण भागात आजही साप चावल्यावर मंत्रोपचारावर विश्वास ठेवला जातो. ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.

सर्पदंशावर मंत्रतंत्र काम करतात का?
खरं तर, आपल्या भारतात जवळपास 80 टक्के साप बिनविषारी असतात, तर फक्त 20 टक्के साप विषारी असतात. बहुतेक विषारी सापांमध्ये मण्यार आणि कोब्रा (नाग) यांचा समावेश होतो. असं म्हणतात की हे साप खूप विषारी असतात आणि उन्हाळ्यात ते अधिक आक्रमक होतात. त्यांनी चावा घेतल्यानंतर भूतबाधा असल्याचा समज करून तो उतरवण्याचा प्रयत्न केल्यास काही उपयोग होत नाही.

काही लोकांना मंत्राचा उपयोग झालेले आपण ऐकलेले असते
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, "सर्वात जास्त प्रकरणं बिनविषारी सापांशी संबंधित असतात, कारण त्यांची संख्या जास्त आहे." याचमुळे, काही लोक बिनविषारी सापांनी चावा घेतल्यानंतर भूतबाधा असल्याचं समजून तो उतरवण्याच्या प्रयत्नात वाचतात. यामुळे लोकांचा भूतबाधेवरील विश्वास वाढतो. पण विषारी सापांनी चावा घेतलेल्या रुग्णांचा भूतबाधा उतरवण्याच्या प्रयत्नात मृत्यू होतो.

काही प्रकारचे विंचूही धोकादायक, गमबूट वापरणे फायद्याचे
काही प्रकारचे विंचूही अत्यंत विषारी असतात. त्यांच्यापासूनही वाचण्यासाठी पायात बूट वापरणे आणि सावध राहणे महत्त्वाचे आहे. शेतात फिरताना किंवा जंगलभ्रमंती करताना बूट किंवा गमबूट वापरणे फायद्याचे असते. सरकारी रुग्णालयांमध्ये याविषयीच्या सूचना लिहिलेल्या असतात. उन्हाळ्यात साप जास्त प्रमाणात दिसून येतात. तेव्हा सावध राहणे हे सर्वांत चांगला पर्याय आहे.

सापांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झालीय
साप विषारी आहे की बिनविषारी हे बहुतेकांना ओळखता येत नाही. मात्र, तो दिसला की, ग्रामीण भागात आजही त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विषारी सापांची संख्या अजून कमी झाली आहे. विषारी सापांची संख्या कमी झाल्यामुळे मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. हे देखील एक कारण आहे की, लोक भूतबाधेवर विश्वास ठेवतात. पण सत्य हे आहे की विषारी सापाने चावा घेतल्यानंतर रुग्णाला उपचारातूनच वाचवता येऊ शकतं. प्रत्येक रुग्णालयात अँटीडोट (विषबाधावरचे औषध) उपलब्ध आहे.

हेही वाचा - दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?

साप हेही जैवविविधतेचा भाग असल्याने त्यांना मारणे योग्य नाही
साप त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहत असतात. तेही निसर्गाचा आणि आपल्या परिसरातील जैवविविधतेचा भाग आहेत. सध्या शासनाकडून साप न पकडण्याचे आणि न मारण्याने आवाहन वारंवार केले जाते. साप दिसल्यास शक्यतो सर्पमित्रांना बोलावून तो साप पकडून घेऊन जाण्याची विनंती करावी. अनेकजण थोड्या मोबदल्यात किंवा काही प्राणीप्रेमी मोफतही हे काम करतात. शक्य असल्यास, स्वतःही साप पकडणे आणि त्याला नैसर्गिक अधिवासात योग्य प्रकारे सोडून देणे शिकून घ्यावे.

विषारी सापाने चावा घेतल्यास उपचारच योग्य
कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला साप चावला, तर त्वरित त्या भागाच्या वरच्या बाजूला घट्ट कापड बांधून रुग्णालयात जा. प्रत्येक सरकारी रुग्णालयात सापाच्या चाव्यावरील उपचारांची सोय आहे. जर बिनविषारी सापाने चावा घेतला असेल, तर तुम्ही वाचू शकता. जर विषारी सापाने चावा घेतला असेल, तरीही त्वरित उपचार घेतल्याने तुम्ही वाचू शकता.


सम्बन्धित सामग्री