Menstruation Delaying Pills : एका 18 वर्षांच्या मुलीने मासिक पाळी थांबवण्यासाठी काही हार्मोनल औषधे घेतली ज्यामुळे तिला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) झाला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर स्थितीत असेलेली पाहून डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परंतु मुलीच्या कुटुंबाने तिला दाखल करणे आवश्यक मानले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचा मृत्यू झाला.
बंगळुरू येथील रक्तवहिन्यासंबंधी सर्जन डॉ. विवेकानंद (Vascular Surgeon Dr. Vivekenand) यांनी त्यांच्या 'रीबूटिंग द ब्रेन' या पॉडकास्टमध्ये या घटनेबद्दल सांगितले. 14 ऑगस्टच्या भागात ते न्यूरोसर्जन डॉ. शरण श्रीनिवासन यांच्याशी डीप व्हेन थ्रोम्बोसिसच्या धोक्याबद्दल बोलत होते. या भागात, डॉ. विवेकानंद यांनी त्या मुलीचा उल्लेख केला.
घरी पूजेत सहभागी होण्यासाठी या मुलीने तीन दिवस मासिक पाळी थांबवण्यासाठी हार्मोनल गोळी घेतली. यानंतर या 18 वर्षांच्या मुलीच्या गुडघे आणि मांडीत वेदना होऊ लागल्या. तेव्हा तिचे वडील तिला घेऊन डॉक्टरांकडे पोहोचले. डॉक्टरांनी निदान केले की, वेदनांचे कारण डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) हे होते. यामुळे मुलीला भयंकर त्रास होत होता. तपासणीत तिच्या मांडीपासून नाभीपर्यंत रक्ताच्या गुठळ्या पसरलेल्या आढळल्या. डॉ. विवेकानंद यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु कुटुंबाने डॉक्टरांचा सल्ला मानला नाही. दुसऱ्या दिवशी या मुलीला तिची आई रुग्णालयात दाखल करण्यास घेऊन येईल, असे सांगत तेथून काढता पाय घेतला. अशा पद्धतीने प्रकृतीच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे उपचार घेण्यास उशीर झाला आणि रात्रीच्या वेळी या मुलीची स्थिती आणखीनच बिघडली. तिला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे अखेर तिचा मृत्यू झाला.
हार्मोनल गोळ्यांमुळे रक्ताच्या गुठळ्या कशा तयार होतात?
डीप व्हेन थ्रोम्बोसिस ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या रक्त प्रवाह थांबवतात किंवा रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण करतात. तसेच, त्या शरीराच्या इतर भागांतही रक्तातून पसरू शकतात. अशा वेळेस रुग्णाची अवस्था गंभीर बनते. ते प्राणघातक ठरू शकते. मासिक पाळी थांबवण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे हे घडण्याची शक्यता असते. ज्यामध्ये मासिक पाळी थांबते आणि शरीरात गुठळ्या पसरू लागतात.
हेही वाचा - Antibiotics Side Effects: अँटीबायोटिक्स खाणे किती धोकादायक? नवीन संशोधनातून झाला धक्कादायक खुलासा
डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) कधी घातक बनते?
जेव्हा रुग्णाला पल्मोनरी एम्बोलिझम होतो तेव्हा DVT घातक बनते. यामध्ये, DVT फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे छातीत तीव्र वेदना सुरू होतात. सहसा, DVT ग्रस्त रुग्णांच्या नसा खराब होतात आणि बराच काळ शरीरात सूज, वेदना आणि जखमा तयार होऊ लागतात.
कोणत्या परिस्थितीत DVT अधिक धोकादायक आहे?
1. पहिल्यांदाच हार्मोनल गर्भनिरोधक औषधे घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षात जास्त धोका असतो.
2. लठ्ठपणा, धूम्रपान, लांब प्रवास आणि जास्त झोपेची विश्रांती यासारख्या परिस्थितीत.
3. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर धोका जास्त असतो.
4. कौटुंबिक इतिहासामुळे थ्रोम्बोसिसचा धोका देखील होऊ शकतो.
डीव्हीटीची लक्षणे
- मांडी किंवा पिंडरीमध्ये सूज, वेदना किंवा उष्णता
- फुफ्फुसात गाठ अडकणे किंवा रक्त साचणे
- अचानक छातीत दुखणे
- श्वास घेण्यास त्रास होणे किंवा बेशुद्ध होणे
मासिक पाळी थांबवण्यासाठी हार्मोनल गोळ्या सुरक्षित आहेत का?
मासिक पाळी थांबवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी हार्मोनल औषधे वापरली जातात, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे करणे देखील घातक ठरू शकते. या गोळ्यांचे सेवन केल्याने डीव्हीटी सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा - Food Before Sleep : रात्री वारंवार झोपमोड होते? मग खाण्याच्या 'या' चुकीच्या सवयी टाळाव्याच लागतील