Monday, September 01, 2025 09:17:53 AM

पंकजा मुंडेंवर थेट आरोप; काय म्हणाल्या दमानिया?

बीडमधील देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना आता अंजली दमानिया यांनी तेथील परिस्थितीबाबत थेट पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं आहे.

पंकजा मुंडेंवर थेट आरोप काय म्हणाल्या दमानिया

बीड : बीडमधील देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना आता अंजली दमानिया यांनी तेथील परिस्थितीबाबत थेट पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. यानिमित्ताने बीड हत्याप्रकरणी नव्या राजकीय वादाला सुरूवात झाली आहे.

 

हेही वाचा : भाजपाचे निवडणूक मिशन 3.0

 

दमानियांचा पंकजा मुंडेंवर आरोप 

पंकजा मुंडे ताई, तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते
तुमच्या मतदारसंघात क्रूर  हत्या झाली आहे
खरंतर तुम्ही रोज त्या हत्येबद्दल बोलायला हवं होतं
त्या कुटुंबाच्या घरी जावून जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवं होतं
पण तुम्ही ह्यातलं काहीच केलं नाही
बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावबहिणीने तुमच्या दहशतीने बदनाम केलंय
तुम्हाला सुरक्षा आहे, सामान्य जनतेला नाही
तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

 

आमदार सुरेश धस यांनी सातत्याने केलेल्या आरोपांना उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी धस यांच्यावर पलटवार केला होता. पंकजांच्या त्या आरोपावर अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत पंकजावर निशाणा साधला आहे. 

पंकजा मुंडे काय बोलल्या होत्या?

सुरेश धस  यांच्यामुळे बीड बदनाम झालं आहे 
राजकीय भूमिका न घेता या विषयाकडे संवेदनशीलतेने बघायला हवं होतं
तर असं काही झालं नसतं 
मी एक महिला आहे,आम्हीही बीडमध्ये राहतोय, तेथे राज काम करते

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

देशमुख हत्याप्रकरणात राज्यभरात आक्रोश मोर्चे सुरू आहेत. देशमुख हत्याप्रकरणी त्या कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. याप्रकणातील आरोपींना मकोका लागलाय. त्यात आता नवे आरोप-प्रत्यारोप होवू लागल्याने त्या प्रकरणाला खऱ्या अर्थाने राजकीय वळण लागू लागलं आहे. 


सम्बन्धित सामग्री