How To Make Shanidev Happy? : खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल, आर्थिक संकटं सतावत असतील, तर तुमच्या कुंडलीतील शनी कमजोर असण्याची शक्यता असते. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, शनीचा थेट संबंध 'काका'शी असतो. हो.. ज्योतिषी म्हणतात, काकासोबत नातं चांगलं असेल तर, शनिदेवांची नाराजी कमी होते. जर तुमच्याही आयुष्यात अशी काही स्थिती असेल तर...
मागील पिढीच्या तुलनेत सध्या सर्वांकडेच साधनं जास्त आहेत आणि स्पर्धा जास्त आहे. कारण, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी बरीच जास्त मेहनतही घ्यावी लागत आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर धावपळ करूनही बऱ्याचदा आयुष्यात असं होतं की, खूप मेहनतीनंतरही यश दूरच राहतं. नशीब जणू साथ सोडतं. अशा परिस्थितीत जर तुमच्या कुंडलीत शनी कमजोर असेल आणि संघर्ष संपत नसेल, तर तुम्ही तुमच्या 'काका'सोबतचे संबंध कसे आहेत, याचा विचार करा. अनेक ज्योतिषी असे सांगतात की, "शनिचा थेट संबंध काकाशी असतो." जर एखाद्या व्यक्तीचे त्याच्या काकाशी असलेले संबंध बिघडले, तर शनिदेव नाराज होतात आणि जीवनातील संघर्षात वाढ होते.
हेही वाचा - मुस्लीम असूनही नुसरतने केलं 16 शुक्रवारचं व्रत! केदारनाथ-बद्रीनाथलाही गेली.. म्हणते, 'माझ्या आतला आवाज..'
काकाशी भांडण केल्यामुळे ओढवते शनिदेवांची नाराजी!
"शनिदेव जर नाराज झाले, तर राजाला रंक करायला क्षणभरही लागत नाही, असं म्हटलं जातं. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या काकांच्या स्वभावामुळे त्रास असेल, तर त्यांच्यापासून अंतर राखणे चांगले, पण त्यांच्याशी उद्धटपणे किंवा कठोरपणे वागू नका. त्यांचा मान राखून योग्य शब्दांत स्वतःचे म्हणणे सांगा. त्यांचे म्हणणेही समजून घ्या. गैरसमज किंवा मोठे भांडण किंवा बऱ्याच काळासाठी नात्यात कटुता येईल, असा प्रसंग टाळा. जर काकाशी भांडणं झाली, अपमानास्पद शब्द वापरले गेले किंवा नात्यात कटुता आली, तर त्याचा थेट परिणाम शनिदेवावर होतो. परिणामी, व्यक्तीला जीवनात अपयश, आजारपण आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. गुडघेदुखीचे आजार, चेहऱ्यावरील तेज कमी होणे आणि खूप मेहनत करूनही फळ न मिळणे, हे सर्व शनि अशुभ असण्याचे संकेत आहेत.
शनिदेवाला शांत ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय!
जर परिस्थिती वाईट असेल, तर आपल्या काकाशी कमी बोला, पण त्यांचा अपमान करणं टाळा. शांतपणे आणि नम्रपणे वागल्याने शनिदेवाला शांत ठेवता येतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील, तर तुमच्या काकाशी असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. बोलून प्रश्न सोडवलेले चांगले. शक्यतो दोघांनाही नुकसान होणार नाही, असे तोडगे काढण्याचा प्रयत्न करा.
कोणतेही यश मिळवण्यासाठी किंवा मोठ्या काळासाठी चांगल्या स्थितीत राहण्यासाठी विविध लोकांशी चांगले संबंध असणं महत्त्वाचं आहे. बिघडलेले संबंध आपला बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा फुकट घालवतात. संबंध चांगले राखल्याने हाच वेळ आणि हीच ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरता येते. तेव्हा, केवळ काकाशीच नव्हे, तर कोणाशीही व्यवस्थित वागणे-बोलणे नेहमीच फायद्याचे असते. एखादी व्यक्ती खूपच दुर्जन असल्याचा अनुभव आल्यास त्याच्याशी संबंध बिघडवण्याऐवजी ते कमी करणे चांगले.
हेही वाचा - केदारनाथ यात्रेदरम्यान 'या' ठिकाणांनाही नक्की भेट द्या; मन होईल प्रसन्न
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)