Wednesday, August 20, 2025 02:07:55 PM

मुख्यमंत्री शिंदे चेंबूरमध्ये पोहोचले

चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत आगीची  घटना घडली आहे.

मुख्यमंत्री शिंदे चेंबूरमध्ये पोहोचले

मुंबई : चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनीत आगीची  घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. इतर नागरिकांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.रविवारी पहाटे ही घटना घडली आहे. 
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आग दुर्घटनेची चौकशी होईल असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 


सम्बन्धित सामग्री