पुणे: सद्या राज्यात चाललंय काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय. कुठे मुली बेपत्ता होताय तर कुठे मुलींची हत्या. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातून समोर आलाय. पुण्यातील राजगुरूनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही अल्पवयीन मुली सख्या बहिणी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी नामे अजय दास याने या दोन बहिणींपैकी एकीवर अतिपरासंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब बाहेर येऊ नये म्हणून आरोपीने या दोन्ही बहिणींची हत्या केली असल्याचं समोर आलाय.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ खेळत असताना दोन चिमुकल्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर राजगुरूनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह एका पिंपामध्ये आढळून आले. दोन्ही बहिणी 8 आणि 9 वर्षांच्या होत्या. पीडित कुटुंबाच्या घराजवळ एक आचारी राहायला आला होता. त्यानंच या दोन्ही मुलींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
आरोपी आचाऱ्यानं गोड बोलून दोन्ही चिमुकल्यांना घराकडे नेलं. नंतर एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिनं विरोध केला, आरडाओरडा केला. आपलं बिंग फुटेल या भीतीनं आरोपीनं एकीचा जीव घेतला. तसंच दुसऱ्याही बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीनं पिंपामध्ये मृतदेह ठेवले आणि घरालगतच्या इमारतीजवळ पिंप ठेवले.
या संपूर्ण घटनेमुळे पुणे शहरात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वंकडून जोर धरू लागलीय. या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन निरागस चिमुकलींची काय चुकी? नेमकी कोणत्या चुकीची त्यांना ही अशी शिक्षा मिळाली असे संतापजनक प्रश्न देखील सर्वजण उपस्थित करताय.