Sunday, August 31, 2025 06:11:58 AM

पैशाचं पाऊस पाडण्याचं अमिष, गुप्तागांचं पूजन, २०० तरूणींसोबत घाणेरडा खेळ

गरीब लोकांना पैशाचं पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून तांत्रिक विधीच्या नावाखाली तरुणींना त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळं करून विधी केली जायचे. यामध्ये तरुणींच्या गुप्तांगाची पूजा केली जायची.

पैशाचं पाऊस पाडण्याचं अमिष गुप्तागांचं पूजन २०० तरूणींसोबत घाणेरडा खेळ
पैशाचं पाऊस पाडण्याचं अमिष, गुप्तागांचं पूजन, २०० तरूणींसोबत घाणेरडा खेळ

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं अनेकांना फसवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या टोळीकडं २०० हून अधिक तरुणींचे अश्लील व्हिडिओ आढळले आहे. या टोळीनं शेकडो लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

सदर टोळी गरीब लोकांना पैशाचं पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत होती. तांत्रिक विधीच्या नावाखाली तरुणींना त्यांच्या कुटुंबीयांपासून वेगळं करून विधी केली जायचे. यामध्ये तरुणींच्या गुप्तांगाची पूजा केली जायची. तांत्रिक विधीनंतर काय होत होतं, हे पीडित महिलांनाही माहित नसायचे. त्यावेळी टोळीतील सदस्य महिलांचे व्हिडिओ गुपचूप चित्रीत करून त्यांची विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हा प्रकार मागील सात-आठ वर्षांपासून सुरू असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

हेही वाचा - सत्ताधारी आमदाराचा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप

असा झाला पर्दाफाश
या प्रकरणाचा पर्दाफाश एका तरुणाच्या अपहरणामुळे झाला. त्याच्यावर तांत्रिक विधी करून हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीनं छापा टाकून टोळीचा भांडाफोड केला आणि प्रमुख आरोपींना अटक केली.

हेही वाचा - माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केला खळबळजनक खुलासा

ही टोळी उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये सक्रिय होती. आग्रा शहरात विशेषतः त्यांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं. पोलिसांनी टोळीतील सर्व प्रमुख आरोपींना अटक केली आहे आणि उर्वरित आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. पोलिसांनी अशा अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन केलं आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री