Wednesday, September 03, 2025 09:03:55 PM

नाशिकमध्ये मध्यरात्री थरार; जमावाकडून पोलिसांवर दगडांचा मारा, 4 ते 5 पोलीस जखमी

सुमारे 400 नागरिकांनी रस्त्यावर उतरून अचानक दगडफेक केली. या अचानक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं

नाशिकमध्ये मध्यरात्री थरार जमावाकडून पोलिसांवर दगडांचा मारा 4 ते 5 पोलीस जखमी

नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा मोठा गोंधळ उडाला. सुमारे 400 नागरिकांनी रस्त्यावर उतरून अचानक दगडफेक केली. या अचानक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिस दलातील 4 ते 5 पोलीस जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिक महापालिकेच्या एका कारवाईनंतर घडली. अलीकडेच महापालिकेने एका धार्मिक स्थळावर कारवाई करत नोटीस बजावली होती. त्याचे पडसाद शहरभर उमटले असून, यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

सायंकाळच्या सुमारास शहरात विविध अफवा पसरल्याने तणाव अधिकच वाढला. प्रशासनाने वेळेवर खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त वाढवला असला, तरीही मध्यरात्री जमावाने अचानक हिंसक रूप घेतले. काही वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात तणावाची स्थिती कायम असून, प्रशासन घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहे.

नाशिक पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 


सम्बन्धित सामग्री