Wednesday, September 03, 2025 03:24:04 PM

बंडखोरांना विधान परिषदेच्या पाच जागांचे आमिष

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे.

बंडखोरांना विधान परिषदेच्या पाच जागांचे आमिष

मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सर्वच पक्षांना बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. सत्ताधारीही त्याला अपवाद नाही. महायुतीत तीन पक्ष असल्याने तिन्ही पक्षांमधील इच्छुकांचे समाधान करणे शक्यच नव्हते. हीच गत महाविकास आघाडीतही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते बंडोबांना थंड करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड सर्व उपायांचा वापर केला जात आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त पाच जागांवर वर्णी लावून आमदारकी देण्याचे आमिष दाखवले जात आहे. बंडखोरांची संख्या अधिक असल्याने या पाच जागांवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांचे प्रकरण गेल्या सरकारमध्ये चांगलेच गाजले होते, त्यावर न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. त्यानंतर महायुतीने त्या १२ पैकी ७ जागा भरून पाच जागा रिक्त ठेवल्या आहेत. त्या पाच जागांवर आता नाराजांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 


सम्बन्धित सामग्री