मुंबई : 9 डिसेंबर डिसेंबरची 'ती' रात्र अनेकांसाठी काळी रात्र ठरली. त्या रात्री क्षणात होत्याच नव्हतं झालं. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस.जी. बारवे मार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात घडला आणि सर्वत्र एकाच खळबळ उडाली. दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी रात्री 09:50 वाजता बेस्ट बसने रस्त्यावर असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण जखमी झाले आहेत. यामुळे अपघातग्रस्तांचा कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. यातच आता 'तुम्ही पाच लाख रुपये मदत करत आहात. मी पाच लाख रुपये तुम्हाला परत देतो. तुम्ही कुर्ला परिसरातील परिस्थिती सुधारा' असे भाष्य अपघातग्रस्ताच्या कुटुंबीयाने केले आहे.कुर्ला येथीस बेस्ट बस अपघातात 63 वर्षीय कनिस फातीमा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुलगा आबिद याने माध्यमांशी संवाद साधताना बेस्ट प्रशासनासह BMC वर गंभीर आरोप केले आहेत.
काय आहेत आरोप?
तो म्हणाला की, माझी आई कनिस फातीम या दास रुग्णालयामध्ये कामाला होत्या. अपघात झाला त्यादिवशी त्या 9 वाजता कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. त्यानंतर अर्ध्या तासांनी आम्हाला अपघात झाल्याचा फोन आला. आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधाशोध केली असता बस आणि कारच्या मधोमध आईचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून बाबा हॉस्पिटलमध्ये मृतदेह नेण्यात आला. हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. जेव्हा मी माझ्या आईला पहिल्यांदा पाहिल तेव्हा तिच्या हातातले, कानातले आणि गळ्यात चैन होती. मात्र अर्ध्या तासाने पाहिल्यानंतर गळ्यातील चईन फक्त पोलिसांनी आम्हाला आणून दिली. मात्र हातातले आणि कानातले मिळाले नाही, असा आरोप आबिद याने केला आहे.
तुम्ही पाच लाख रुपये मदत करत आहात. मी पाच लाख रुपये तुम्हाला परत देतो. तुम्ही कुर्ला येथील परिस्थिती सुधारा. माझा BMC ला प्रश्न आहे, तुमच्या समोर अनधिकृत धंदे सुरू आहेत, पार्किंग सुरू आहे. हे कसे लागतायत. याची कोणालाच माहिती नाही का? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे आबिद याने म्हटले आहे.