Sunday, August 31, 2025 11:30:01 AM

Results About You: आता इंटरनेटवरून तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकणे होणार सोपे! गुगलने लाँच केले खास Tool

या टूलद्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांचा फोन नंबर, ईमेल, घराचा पत्ता, क्रेडिट कार्ड माहिती आणि इतर संवेदनशील डेटा शोध निकालांमधून काढून टाकण्याची विनंती करू शकते.

results about you आता इंटरनेटवरून तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकणे होणार सोपे गुगलने लाँच केले खास tool
Google Results About You Tool
Edited Image

Results About You: गुगल नेहमीचं आपल्या यूजर्संसाठी काही नवीन फीचर अपडेट करत असते. आता गुगलने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या संरक्षणासाठी खास टूल लाँच केले आहे. गुगलने त्यांच्या रिझल्ट्स अबाउट यू टूल (Results About You) मध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत, ज्यामुळे वापरकर्ते त्यांची वैयक्तिक माहिती इंटरनेटवरून सहजपणे काढून टाकू शकतात. या टूलद्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांचा फोन नंबर, ईमेल, घराचा पत्ता, क्रेडिट कार्ड माहिती आणि इतर संवेदनशील डेटा शोध निकालांमधून काढून टाकण्याची विनंती करू शकते.

रिझल्ट्स अबाउट यू टूल कसे काम करते?

रिझल्ट्स अबाउट यू टूल वापरकर्त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती ओळखण्याचा आणि हटवण्याचा पर्याय देते. जेव्हा जेव्हा तुमची वैयक्तिक माहिती शोध निकालात दिसेल तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल. यानंतर तुम्ही ती माहिती काढून टाकण्यासाठी थेट गुगलला विनंती पाठवू शकता. गुगलचे नवीन रिझल्ट्स अबाउट यू टूल त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, ज्यांना त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवायची आहे. 

हेही वाचा - Girlfriend ने Delete केलेला WhatsApp मेसेज कसा Recover करायचा? जाणून स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

गुगलवरून खाजगी डेटा हटवण्याची प्रक्रिया काय आहे?

प्रथम, तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओएस डिव्हाइसवर गुगल अॅप उघडा. 
त्यानंतर प्रायव्हसी टूलवर जा. 
येथे रिजल्ट्स अबाउट यू हा पर्याय निवडा. 
तुम्हाला काढून टाकायची असलेली वैयक्तिक माहिती निवडा.
माहितीची पडताळणी केल्यानंतर, गुगलला हटविण्याची विनंती पाठवा.

हेही वाचा - आता शेतीतही होणार AI चा वापर! Artificial Intelligence च्या मदतीने शेतकरी करू शकतात 'ही' काम

कोणती माहिती हटवण्यात येईल?

फोन नंबर, ईमेल आणि घराचा पत्ता
क्रेडिट कार्ड नंबर
लॉगिन क्रेडेन्शियल्स

गुगलचे यूजर्संच्या गोपनीयतेच्या संरक्षणासाठी मोठे पाऊल - 
दरम्यान, गुगलने म्हटले आहे की, हे फीचर काही देशांमध्ये लाँच करण्यात आले आहे. परंतु, लवकरच ते जागतिक स्तरावर लाँच केले जाईल. या उपक्रमाचा उद्देश वापरकर्त्यांना त्यांच्या डिजिटल ओळखीवर अधिक नियंत्रण देणे आणि गोपनीयता सुनिश्चित करणे आहे. 
 


सम्बन्धित सामग्री