पुणे : हरियाणा स्टीलर्सने (Haryana Steelers) धडाकेबाज कामगिरी करत प्रो कबड्डीच्या २०२४ (Pro Kabaddi 2024) मोसमाचे जेतेपद पटकावले. हरियाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स (Patna Pirates) यांच्यामध्ये अंतिम (Final) फेरीचा सामान लढला होता. हरियाणाच्या संघाने यावेळी सुरुवातीपासून दमदार खेळ केला आणि आघाडी कायम ठेवली होती. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि जेतेपद पटकावले. हरियाणाच्या संघाने यावेळी पाटण्याच्या संघावर ३२-२३ असा विजय साकारला आणि जेतेपद पटकावले.
हरियाणाकडून यावेळी शिवम पाटारे (Shivam Patare) हा मॅचविनर (Matchwinner) ठरला. कारण शिवमने फक्त चढाईतच गुण मिळवले नाही, तर त्याने चांगला पकडीही केल्या. शिवमने यावेळी चढाईत चार गुण कमावले, त्याचबरोबर त्याने पकडीमध्येही चार गुणांची कमाई केली. यावेळी शिवमने एक बोनस गुणही पटकावला. हरियाच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक गुण शिवमच्या नावावर राहिले. शिवमने यावेळी ९ गुणांची कमाई केली.
हरियाणाने यावेळी चांगली चढाई तर केलीच, पण त्यांच्या विजयाचे खरे कारण ठरले ते बचाव (Deffence). यावेळी चांगला बचाव हरियाणाच्या संघाने केला. हरियाणाच्या संघाने यावेळी ११ गुण चढाईत कमावले, तर पकडींमध्ये त्यांनी १५ गुणांची कमाई केली. यामध्ये हरियाणाने पाटणावर लोणही चढवला होता. त्यामुळे हरिणाला दोन गुणांची कमाई करता आली. त्याचबरोबर त्यांनी एक गुण बोनस कमावला. त्यामुळेच हरिणाला पाटणापेक्षा वरचढ यावेळी ठरता आले आणि जेतेपदाला गवसणी घातला आली. हरिणाच्या संघाकडे अव्वल बचाव होता, तो पाटण्याच्या संघाला भेदता आला नाही आणि तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाल्याचे पाहायला मिळाले.
पाटण्याच्या संघाकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना अंतिम फेरीत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पाटणाच्या संघाने चढाईत ११ गुणांची कमाई केली, तर पकडींमध्येही त्यांनी ११ गुण कमावले. एक बोनस गुण त्यांनाही मिळाला. त्यामुळे त्यांचे २३ गुण होऊ शकले. पाटणाच्या संघाकडून गुरदीपने पकडींमध्ये पाच गुण कमावले आणि एक गुण त्याने बोनस मिळवला. पाटणाने या हंगामात चांगली कामगिरी केली होती, पण त्यांना उप विजेतेपदावरच समाधान मानावे लागले.