Friday, September 05, 2025 05:38:47 AM

नेमका कसा झाला बोट अपघात?

मुंबईच्या समुद्रात बोट बुडाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या बोट अपघातात तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमका कसा झाला बोट अपघात

मुंबई: मुंबईच्या समुद्रात बोट बुडाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या बोट अपघातात तब्बल 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांवच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा मुत्यु झालाय. म्हणजे संपूर्ण कुटूंबच उद्धवस्त झालाय. आजारावर उपचारासाठी पिंपळगांवच्या राकेश नाना आहेर हे दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलासह मुंबई येथे गेले होते. परंतु बोट दुर्घेटनेत आहेर कुटुंबियांचा बळी गेला. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकाच खळबळ उडालीय. 

नेमका कसा झाला बोट अपघात? 

गेटवे ऑफ इंडिया परिसरातून आज 18 डिसेंबर रोजी दुपारी नीलकमल नावाची फेरीबोट एलिफंटाकडे जात होती. त्यावेळी एक नौदलाची स्पीड त्याला धडकली. यानंतर प्रवासी बोटचा पुढील भाग तुटला असून बोटमधील 80 पाण्यात बुडाले. या घटनेनंतर 56 जणांना जेएनपीटी रुग्णालयात, ९ जणांना नेव्ही डॉकयार्ड रुग्णालयात, 9 जणांना सेंट जॉर्ज रुग्णालयात आणि एका व्यक्तीला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण 99 जणांची सुटका करण्यात आलीय.

दरम्यान या अपघनानंतर नौदलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलाय. एक्स वर पोस्ट करत अपघाताचं कारण नौदाकडून सांगण्यात आलंय. भारतीय नौदलाच्या एका बोटीच्या इंजिन चाचणीदरम्यान मुंबई बंदरात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने नियंत्रण सुटले. त्यामुळे एका प्रवासी फेरीला बोट धडकली.

यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून बचावलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आलंय. समुद्रात बुडालेल्यांच्या शोधासाठी 4 नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल विमाने, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस क्राफ्टसह बचावकार्याला लागले. असे स्पष्टीकरण नौदलाकडून देण्यात आलाय. 


सम्बन्धित सामग्री