UPI Payment Without Internet Connection
Edited Image
UPI Payment Without Internet Connection: सध्या देशभरातील नागरिक कोणताही व्यवहार करताना UPI चा पर्याय निवडत आहेत. तथापी, UPI वरून पेमेंट करणे अत्यंत सोपे आहे, त्यामुळे सध्याच्या काळात UPI पेमेंट हे व्यवहाराचे एक उत्तम साधन बनले आहे. UPI पेमेंटसाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरू असते गरजेचे असते. परंतु, जेव्हा इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट होते, अशा वेळी आपल्याला नाईलाजाने रोख रक्कम द्यावी लागते.
'असे' करा इंटरनेट कनेक्शनशिवाय पेमेंट -
UPI व्यवहारांसाठी इंटरनेटची आवश्यकता असते, परंतु तुम्हाला माहिती आहे का की इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करता येते? यासाठी, तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून अधिकृत USSD कोड डायल करावा लागेल, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे ऑफलाइन व्यवहार करू शकता. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरू केलेली *99# सेवा तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील बँकिंग सेवांचा लाभ घेण्यास अनुमती देते.
हेही वाचा - Aadhaar Card मध्ये नवीन मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
*99# USSD कोड कसा वापरायचा?
या सेवेद्वारे तुम्ही बँक बॅलन्स तपासू शकता, आंतरबँक निधी हस्तांतरित करू शकता आणि UPI पिन सेट किंवा बदलू शकता. तथापी, जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल आणि तुम्हाला UPI पेमेंट करायचे असेल, तर *99# USSD कोड कसा वापरायचा? त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हेही वाचा - Paytm ने लाँच केला सौरऊर्जेवर चालणारा Payment Soundbox; दिवसभर सूर्यप्रकाशावर चालणार
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करावे?
- तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99# डायल करा.
- यानंतर, स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायांमधून तुमची पसंतीची भाषा निवडा.
- नंतर पैसे ट्रान्सफर करणे, बॅलन्स तपासणे किंवा व्यवहार पाहणे यासारख्या बँकिंग वैशिष्ट्यांपैकी एक निवडा.
- जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर '1' टाइप करा आणि सेंड दाबा.
- नंतर ट्रान्सफर पद्धत निवडा—मोबाइल नंबर, UPI आयडी, सेव्ह केलेला संपर्क किंवा इतर पर्यायांपैकी एक आणि सेंड दाबा.
- मोबाईल नंबर पर्याय निवडताना, प्राप्तकर्त्याचा नंबर प्रविष्ट करा.
- पेमेंट रक्कम एंटर करा आणि नंतर तुमचा UPI पिन एंटर करा आणि व्यवहार पूर्ण करा.
अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकता.