3 Worst fruit juices for health: फळांपासून बनवलेला रस पिणे हे साधारण आहे. मात्र ज्युस प्यायल्याने साखरेशिवाय जास्त काही मिळत नाही. जर रोज तुम्ही फळांचा रस काढून पित असाल तर तुम्ही फॅटी लिव्हर, शुगर स्पाइक, पीसीओडी, इन्सुलिन रेझिस्टन्ससारख्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात. फळं खाणे आरोग्यदायी आहे. पंरतु या तीन फळांच्या रसाचे सेवन करु नये.
फळांचा रस का पिऊ नये?
फळांचा रस न पिण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यातील फायबर आहे, जे रस काढताना बाहेर निघून जातात. तर रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यासाठी, साखरेची वाढ रोखण्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर सर्वात महत्वाचे आहे. यासोबतच, फायबर बद्धकोष्ठता देखील दूर ठेवते. जाणून घ्या कोणत्या 3 फळांचे रस पिऊ नयेत आणि का?
हेही वाचा: Beetroot Water Benefits: एक साधी रेसिपी, पण अफाट फायदे; बीटरूट पाण्याचे रहस्य जाणून घ्या
संत्र्याचा रस
संत्री हे असे फळ आहे जे संपूर्ण खावे, त्याचा रस बनवून पिऊ नये. काहीही असो, संत्र्यामध्ये लगद्याचे (पल्प) प्रमाण कमी असते. जेव्हा आपण त्याचा रस काढतो. तेव्हा फक्त जास्त प्रमाणात कॅलरीज आणि नैसर्गिक साखर उरते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. दुसरीकडे, रस काढल्याने त्यातील सर्व फायबर बाहेर पडते. जे सर्वात महत्वाचे पोषकतत्व आहे.
डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस खूप लोकप्रिय आहे. शरीरात रक्त वाढवण्यासाठी किंवा आजारातून बरे झालेल्या व्यक्तीला निरोगी बनवण्यासाठी लोक अनेकदा डाळिंबाचा रस देतात. हा रस अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी भरलेला असतो. पण जर तुम्हाला डाळिंबाचे पूर्ण फायदे हवे असतील तर डाळिंबाचा रस पिण्याऐवजी त्याच्या बियांसोबत खा. यामुळे शरीराला जास्त प्रमाणात फायबर मिळेल.
बीटरुट रस
फळांप्रमाणेच बीटरूटचा रस पिणे देखील चांगले नाही. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर बीटरूट खा. जेणेकरून तुम्हाला फायबरसह सर्व अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतील. बीटरूटच्या रसात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)