Wednesday, August 20, 2025 09:26:24 AM

VIDEO : वनअधिकाऱ्याने X वर शेअर केला हत्तींच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव

हत्तीच्या या दोन पिल्लांना भेटलेल्या कासवान यांनी पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन केले आहे. &quotत्यांना त्यांचा 'टोल टॅक्स' हवा होता,&quot असं म्हणत त्यांनी या पिल्लांचं कौतुक केलं.

video  वनअधिकाऱ्याने x वर शेअर केला हत्तींच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ लोकांकडून कौतुकाचा वर्षाव

Cute Elephant Calves : आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी X वर एका पोस्टमध्ये हत्तीच्या दोन पिल्लांचा छानसा व्हिडिओ शेअर केला आहे. दुर्दैवाने या दोन्ही पिल्लांनी स्वतःची आई गमावली आहे. या दोन्ही पिल्लांना त्यांच्या आईच्या मृत्युनंतर रेस्क्यू करण्यात आले. या वाचविण्यात आलेल्या हत्तीच्या दोन पिल्लांच्या व्हिडिओला इंटरनेटवर मोठी पसंती मिळत आहे.

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी एक्स वरील एका व्हायरल पोस्टमध्ये गजराज आणि तिस्ता या हत्तीच्या दोन पिल्लांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पिल्लांना त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वाचविण्यात आले. त्यांना आता वन अधिकारी आणि माहूतांच्या देखरेखीखाली वाढवले जात आहे. शेतात या पिल्लांशी झालेल्या भेटीदरम्यान कासवान यांनी त्यांना खाऊ घातले. मात्र, या पिल्लांना अजून खायला हवे होते. अखेर त्यांना थोपटून निरोप देण्यात आला.

हेही वाचा - मुलीने गळ्यात अडकवला साप! आता हसू की रडू कळेना; लोक म्हणाले, भयंकर धाडस!

हत्तीच्या या दोन पिल्लांना भेटलेल्या कासवान यांनी पोस्टमध्ये या भेटीचे वर्णन केले आहे. "काल शेतात असताना, गजराज आणि तिस्ता यांना भेटलो. त्यांना त्यांचा टोल टॅक्स हवा होता. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर दोघांनाही वाचवण्यात आले. आता आमच्या माहुतांच्या देखभालीखाली, ते जवळच्या जंगलात राहत आहेत," असे त्यांनी लिहिले.
व्हिडिओ क्लिपमध्ये, दोन्ही हत्ती निवांत मूडमध्ये वन कर्मचाऱ्यांसोबत मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यांना मिळालेला खाऊ खात आहेत आणि आणखी खाऊ मागत आहेत.

व्हिडिओ येथे पहा:

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पिल्लांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली आणि त्यांची काळजी घेणाऱ्या वन पथकाचे कौतुक केले.
“किती गोड आणि गोंडस पिल्ले आहेत. लहान वयातच त्यांना आपली आई गमावल्याचे दुःख आहे. परंतु, माहूत आणि वन विभाग त्यांची चांगली काळजी घेत आहे हे पाहून आनंद झाला,” असे एका वापरकर्त्याने म्हटले.
दुसऱ्या वापरकर्त्याने पुढे म्हटले, “मला खरोखरच त्या हत्तीच्या पिल्लांना भेटायचे आहे. ती खूप गोड आणि गोंडस आहेत.”
“आता हा एक टोल टॅक्स आहे, जो देण्यास कोणीही आक्षेप घेणार नाही. हे दोघे आतापर्यंतचे सर्वात गोंडस टोल वसूली करणारे आहेत,” असे एका वापरकर्त्याने म्हटले.

हेही वाचा - 10,000 मुलांचा बाप.. 700 किलो वजन.. वय 124! याच्यावर संशोधन करणंही झालंय कठीण.. काय आहे कारण?


सम्बन्धित सामग्री