Tuesday, September 02, 2025 01:41:40 AM

लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन

पुढच्या वर्षी लवकर या.... म्हणत मोठ्या गर्दीत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

लालबागचा राजा गणपतीचं विसर्जन

मुंबई : महाराष्ट्रासह जगभरात गेले दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडताना पाहायला मिळाला. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा तब्बल २४ तासांपूर्वी मंडपातून निघाला होता. राजाला निरोप देण्यासाठी मुंबईसह संपूर्ण राज्यातून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. २४ तासांनंतर  लालबागचा राजाला गिरगाव येथे निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले होते. गणेशभक्तांच्या गर्दीत लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना भक्तजनांचे डोळे पाणावले होते. पुढच्या वर्षी लवकर या.... म्हणत मोठ्या गर्दीत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.     


सम्बन्धित सामग्री