Wednesday, August 20, 2025 02:40:05 PM

IND VS ENG T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; स्टार गोलंदाज शमीचा एक वर्षानंतर कमबॅक

इंग्लंडविरुद्धच्या (England) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

ind vs eng t20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
स्टार गोलंदाज शमीचा एक वर्षानंतर कमबॅक

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या (England) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली संघाची घोषणा केलीय. मात्र, निवड समितीने सध्या वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड काही दिवसांसाठी पुढे ढकललीय. 

दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या संघात निवड समितीने क्रिकेट प्रेमींना गुड न्यूज दिलीय. खूप दिवसांपासून संघाबाहेर असलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच (Mohammed Shami) पुरागमन झालंय. एक वर्षाहून अधिकचा काळापासून तो मैदानाबाहेर होता. बीसीसीआयच्या मुख्यालयात शनिवारी ११ जानेवारी रोजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत संघाची निवड करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.

भारतविरूद्ध इंग्लंड ट्वेटी-२० मालिका वेळापत्रक (Eng vs Ind T20 Series Schedule) -

  • २२ जानोवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता), संध्याकाळी ७.०० वाजता
  • २५ जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई), संध्याकाळी ७.०० वाजता
  • २८ जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट) संध्याकाळी ७.०० वाजता
  • ३१ जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे), संध्याकाळी ७.०० वाजता
  • ०२ फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई), संध्याकाळी ७.०० वाजता

इंग्लंड विरुद्ध टी-20 साठी टीम इंडिया (Team India For T20 Against England) -

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर
 

'>http://


सम्बन्धित सामग्री






Live TV