Nepal Protest: नेपाळमधील जनरेशन-झेड आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत असून, त्याचा फटका आता परदेशी नागरिकांनाही बसू लागला आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पोखरामध्ये गेलेल्या भारतीय महिला उपासना गिल यांनी मदतीसाठी भारत सरकारला तातडीचे आवाहन केले आहे. गिल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, 'त्या ज्या हॉटेलमध्ये राहत होत्या ते आंदोलकांनी जाळून टाकले. माझे सर्व सामान जळून खाक झाले आहे. स्पामधून परतत असताना हातात मोठ्या काठ्या घेऊन जमावाने माझा पाठलाग केला. मी कसाबसा जीव वाचवला.'
भारत सरकारचा प्रतिसाद
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, काठमांडूमधील भारतीय दूतावासाने उपासना गिल यांच्याशी संपर्क साधला असून आवश्यक ती मदत पुरवली आहे.
हेही वाचा - Sushila Karki: जनरेशन-Z च्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांची नियुक्ती
नेपाळमधील हिंसाचाराची स्थिती
या आठवड्यात सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमध्ये किमान 19 नागरिक आणि तीन सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. मंगळवारी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर जमावाने संसदेची तोडफोड, सरकारी इमारतींना आग लावणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या घरांवर हल्ले केले.
हेही वाचा - Gen-Z Meaning: जनरेशन Z म्हणजे कोण? कोणत्या वयोगटातील लोक या पिढीत येतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नेपाळी सैन्याने देशाचा ताबा घेतला आहे. तसेच देशात कर्फ्यू गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. आतापर्यंत आंदोलनांमध्ये सहभागी 27 जणांना अटक करण्यात आली आहे.