Wednesday, August 20, 2025 01:04:27 PM

मंत्रालयात घुसखोरी, गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड

अज्ञात महिलेने मंत्रालयाची सुरक्षा भेदली. मंत्रालयात घुसखोरी केली. थेट सहाव्या मजल्यावर जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठले.

मंत्रालयात घुसखोरी गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड

मुंबई : अज्ञात महिलेने मंत्रालयाची सुरक्षा भेदली. मंत्रालयात घुसखोरी केली. थेट सहाव्या मजल्यावर जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय गाठले. फडणवीसांच्या कार्यालयाच्या आवारात तोडफोड केली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने महिलेला शोधून पकडले. महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पण महिलेचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. 

अज्ञात महिलेने भेदली मंत्रालयाची सुरक्षा
मंत्रालयात घुसखोरी, गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड


सम्बन्धित सामग्री