Sunday, August 31, 2025 06:02:48 AM

LIC Saving Plans: एलआयसीच्या 'या' 4 योजनांमध्ये गुंतवा पैसे, आयुष्यभर राहणार नाही पैशांची चिंता

LIC च्या अशा चार योजना आहेत ज्या दीर्घ मुदतीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. कोणत्या आहेत या योजना? जाणून घेऊयात.

lic saving plans एलआयसीच्या या 4 योजनांमध्ये गुंतवा पैसे आयुष्यभर राहणार नाही पैशांची चिंता
Best LIC Plans प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

LIC Saving Plans: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ही भारतातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह विमा संस्था आहे. अनेक दशके ग्राहकांचा विश्वास जिंकत त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक योजना सादर केल्या आहेत. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक इच्छिणाऱ्यांसाठी LIC च्या योजना फक्त विमा संरक्षणच नाही, तर निश्चित उत्पन्न व चांगल्या परताव्याचे साधन देखील ठरतात. LIC च्या अशा चार योजना आहेत ज्या दीर्घ मुदतीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. कोणत्या आहेत या योजना? जाणून घेऊयात.   

एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी - 

एलआयसी जीवन शिरोमणी ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग आणि वैयक्तिक विमा योजना आहे, जी विशेषतः उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी डिझाइन केली गेली आहे. ही योजना केवळ विमा संरक्षण पुरवत नाही, तर हमी परताव्याचा फायदा देखील देते.

योजनेचे वैशिष्ट्ये - 

कमाल विमा रक्कम 1 कोटीपासून सुरू
केवळ 4 वर्षे प्रीमियम भरावा लागतो.
विमा संरक्षण संपूर्ण मुदतीपर्यंत मिळते. 
मॅच्युरिटी वेळी एकरकमी रक्कम व बोनस

उदाहरण - 
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 30 व्या वर्षी 1 कोटी रुपयांचा विमा रकमेची 20 वर्षांची पॉलिसी घेतली, तर त्याला दरवर्षी सुमारे 7.59 लाख (कर वगळून) प्रीमियम भरावा लागतो, जो फक्त 4 वर्षांसाठी असतो. उर्वरित काळात जीवन कव्हर आणि हमी परतावा चालू राहतो.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी 

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी ही एक उत्तम टर्म प्लॅन मानली जाते. ही योजना सामान्य गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कमी प्रीमियममध्ये उत्कृष्ट कव्हर मिळवून, दीर्घकालीन बचत साठवण्याचा मार्ग यातून खुला होतो. जीवन आनंद पॉलिसी ही साधी आणि परवडणारी योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला कमीत कमी प्रीमियममध्ये देखील चांगला विमा संरक्षण आणि बचत लाभ मिळतो. 

वैशिष्ट्ये - 

प्रीमियम 1358 प्रति महिना पासून सुरू
किमान विमा कालावधी 15 वर्षे
25 लाखांपर्यंत निधी तयार करण्याची संधी
बोनससह परतावा
आयुष्यभर संरक्षण

हेही वाचा - LIC New Scheme: महिलांसाठी एलआयसीची नवी योजना; दरमहा 7,000 रुपये कमवण्याची संधी

जीवन विमा उपाय योजना - 

एलआयसीची 'जीवन विमा उपाय' योजना ही एक नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग वैयक्तिक विमा पॉलिसी आहे, जी एकाच प्रीमियम पेमेंटमध्ये संरक्षण आणि बचत दोन्हीचा लाभ देते. या योजनेत तुम्हाला एकदाच प्रीमियम भरून 15 ते 20 वर्षांचे विमा कव्हर मिळते.

वैशिष्ट्ये - 

विमा रक्कम 2 लाख ते 5 लाख रुपये
प्रीमियम फक्त एकदाच
वयाची मर्यादा 50 वर्षांपर्यंत
सुरक्षित, जोखीममुक्त योजना

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी - 

ही एक बहुउद्देशीय योजना आहे, जिथे विमा संरक्षणासोबत दरवर्षी हमी उत्पन्न मिळते. ही योजना निवृत्तीनंतरही नियमित पैसे मिळवण्यासाठी आदर्श मानली जाते.

वैशिष्ट्ये - 

दरवर्षी विमा रकमेच्या 8% हमी उत्पन्न
प्रीमियम कालावधी संपल्यानंतर उत्पन्न सुरू
100 वर्षांपर्यंत जीवन कव्हर
बोनसचा लाभ
कर्ज सुलभतेचा पर्याय
3 ते 55 वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. 
उत्पन्नाची हमी असल्यामुळे निवृत्तीनंतरचा काळ सुरक्षित
कुटुंबासाठी दीर्घकालीन आर्थिक आधार

हेही वाचा - SIP vs FD: एसआयपी की, एफडी? कशात गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे? जाणून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट

विमा पॉलिसी का घ्यावी? 

एलआयसीच्या या विशेष योजना तुमच्या जीवनाला विमा संरक्षण प्रदान करतात. तसेच आर्थिकदृष्ट्या मजबूत भविष्याची हमी देखील देतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तथापी, काही योजनांमध्ये बोनसचा लाभही मिळतो. एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास विमा रक्कमेमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळतो. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक, दरमहा उत्पन्न, आणि कुटुंबाचे विमा संरक्षण पाहिजे असेल, तर एलआयसीच्या या 4 योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. 

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री