Wednesday, August 20, 2025 03:02:24 PM

औसाच्या गहीनाथ महाराजांना मंत्रिमंडळ शपथविधीचे निमंत्रण

शिष्य व भक्त वर्गात आनंदाचे वातावरण

औसाच्या गहीनाथ महाराजांना मंत्रिमंडळ शपथविधीचे निमंत्रण

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर आज दिनांक ५ डिसेंबर रोजी शपथ विधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. या शपथविधीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला असून यासाठी अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती असणार आहे.

याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या  नवीन मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे खास निमंत्रण लातुरच्या औसा येथील पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष तथा नाथ संस्थांनचे सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मिळाले आहे. त्यामुळे शिष्य व भक्त वर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
 


सम्बन्धित सामग्री