पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्याच्या राजकीय इतिहासात आज एक नवा बदल दिसून आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज पहिल्यांदाच पालकमंत्री कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन झाले. हे उद्घाटन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते पार पडले. जिल्ह्याच्या इतिहासात पालकमंत्र्यांसाठी स्वतंत्र, प्रशस्त केबिन, स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा आणि नागरिकांसाठी थेट प्रवेशाचा मार्ग आहे. या उद्घाटन सोहळ्यात, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना खास खुर्चीवर बसण्याचा मान दिला. याबद्दल मागील काळात, जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्येच बैठका, पत्रकार परिषद होत असत. मात्र यामुळे कामकाज ठप्प व्हायचं. पण आता जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय सुरू झाल्याने, सर्वसामान्यांसाठी दारे उघडली असून जिल्हा प्रशासनाच्या कामकाजात नवा वेग अपेक्षित आहे.