Thursday, August 21, 2025 03:58:49 AM

Anandamayi Bajaj : आनंदमयी बजाज यांच्यावर बजाज ग्रुपची धुरा; प्रथमच एका महिलेकडे ही जबाबदारी

कुशाग्रा बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज या ग्रुपमध्ये सामील झाल्या आहेत. त्या स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजर म्हणून काम करतील. चला जाणून घेऊया आनंदमयी बजाजबद्दल..

anandamayi bajaj  आनंदमयी बजाज यांच्यावर बजाज ग्रुपची धुरा प्रथमच एका महिलेकडे ही जबाबदारी

Who is Anandamayi Bajaj : बजाज ग्रुपचे चेअरमन कुशाग्र बजाज यांची मुलगी आनंदमयी (वय 22) या महिन्याच्या सुरुवातीला 2.5 अब्ज डॉलर्सच्या कौटुंबिक व्यवसायात महाव्यवस्थापक (धोरण - स्ट्रॅटेजी मॅनेजर) म्हणून सामील झाल्या. त्यांचा ग्रुपमध्ये सामील होणे हे प्रमुख व्यावसायिक कुटुंबांमधून येणाऱ्या आणि व्यवस्थापनात भूमिका घेणाऱ्या महिलांच्या वाढत्या ट्रेंडचा एक भाग आहे. आनंदमयी बजाज यांची बजाज उद्योगाची उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाली आहे. त्या या समुहाच्या पहिल्या महिला उत्तराधिकारी ठरल्या आहेत.

आनंदमयी बजाज कोण आहेत?
कुशाग्र बजाज यांची मुलगी आनंदमयी यांची आई वासवदत्ता बजाज या आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची बहीण आहेत. आनंदमयी यांनी जूनमध्ये कोलंबिया विद्यापीठातून आर्थिक अर्थशास्त्र आणि गणितात पदवी प्राप्त केली. त्यांच्या नवीन भूमिकेत, त्या ग्रुपच्या विविध व्यवसायांच्या नेतृत्व संघांसोबत जवळून काम करतील आणि नंतर कंपन्यांच्या बोर्डमध्ये सामील होतील.

हेही वाचा - Billionaires of India : अंबानी कुटुंबाकडे अदानींपेक्षा दुप्पट संपत्ती; बहुतेक अब्जाधीश 'या' शहरातले

आनंदमयी यांना प्राण्यांची काळजी आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आवड आहे. त्यांना दोन लहान भाऊ आहेत - युगादिकृत (वय 20) आणि विश्वरूप (वय 17). युगादिकृत पदवी घेत आहे आणि दोन वर्षांत या समूहात सामील होतील. एचआर कॉलेजमध्ये शिकणारे विश्वरूप पोलो चॅम्पियन आहेत. आनंदमयी यांच्या नियुक्तीबद्दल कुशाग्र यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, तिच्यात 'तरुणाईची उत्सुकता आणि स्थिर जबाबदारीचे अनोखे मिश्रण' आहे. तिचा प्रवास फक्त तिचा नाही.. तो आपल्या सामूहिकतेचा म्हणजेच, सर्वांच्या एकत्र असण्याचा एक भाग आहे.

बजाज समूहाचे व्यवसाय
बजाज ग्रुप 100 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. याची एकूण संपत्ती 5 अब्ज डॉलर्सची आहे. हा समूह साखर, इथेनॉल, वीज आणि पर्सनल केयर (वैयक्तिक काळजी) व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. या समूहाने 12,000 हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. 2008 मध्ये ते मूळ बजाज ग्रुपपासून वेगळे झाले. 1930 च्या दशकात जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेला मूळ बजाज ग्रुप कुशाग्रचे चुलत भाऊ राजीव बजाज (बजाज ऑटो एमडी) आणि संजीव बजाज (बजाज फिनसर्व्ह सीएमडी) यांच्याद्वारे चालवला जातो.

राजीव यांचा मुलगा ऋषभ हा बजाज ऑटोमध्ये विभागीय व्यवस्थापक (उत्पादन धोरण - प्रोडक्ट स्ट्रॅटेजी) म्हणून काम करतो, तर संजीव यांची मुलगी संजली बजाज फिनसर्व्हमध्ये काम केल्यानंतर हार्वर्डमधून एमबीए करत आहे.

हेही वाचा - Independence Day Special: हे आहेत आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 सर्वात मोठे गैरसमज


सम्बन्धित सामग्री