Labubu Doll : चिनी लोक विचित्र आहेत यात काही शंका नाही. त्यांचे राहणे, त्यांचे कपडे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे खाणे सर्वांनाच खूप विचित्र वाटते. अशा या विचित्र चिनी लोकांची एका विचित्र बाहुलीला पसंती मिळत आहे. आता या बाहुलीची लोकप्रियता जगभरात पसरली आहे.
लाबुबू डॉलची जादू जगभर पसरलेली आहे. लोक ती खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. ..आणि ज्याने ती बनवली, तो आता अब्जाधीश झाला आहे. लाबुबू डॉलचा मालक आता चीनमधील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये समाविष्ट झाला आहे.
लाबुबू डॉल दिसायला विचित्र असूनही जगभर प्रसिद्ध झाली आहे. तिचे मोठे डोळे, सशासारखे कान आणि दात बाहेर काढून केलेलं विचित्र हास्य असं वैशिष्ट्य आहे. पहिल्या नजरेत पाहणाऱ्यांना तिला पाहून नक्कीच अजब वाटू शकते. अनेक लोकांना ती आवडणार सुद्धा नाही. तरीही ही वैशिष्ट्ये या बाहुलीला आणखी लोकप्रिय करत आहेत. विशेष म्हणजे, तिची किंमत जास्त असूनदेखील चाहत्यांची या बाहुलीविषयीची क्रेझ कमी झालेली नाही. लोक कोणत्याही किंमतीत ती मिळविण्यास तयार दिसतात. ही बाहुली आता बॉलीवूड सेलिब्रिटिजपासून अनेक लोकांमध्ये भारतातही लोकांच्या पसंतीला उतरू लागली आहे.
हेही वाचा - US Visa Rules: अमेरिकेचा मोठा निर्णय! आता भारतीयांना परदेशात व्हिसा इंटरव्ह्यू देता येणार नाही; NIV इंटरव्यूच्या नव्या अटी लागू
लाबुबू कोणी बनवली?
एका वृत्तानुसार, लाबुबू डॉलच्या या अवतारामागे चीनचा वांग निंग आहे. 38 वर्षांचा वांग निंग हा एक बिझनेस टायकून म्हणजे खूप मोठा उद्योगपती आहे. तो पॉप मार्ट इंटरनॅशनल ग्रुपचा संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ आहे.
चीनमध्ये वांग निंग यांनी सुरू केलेले पॉप मार्ट आज त्याच्या वेगवेगळ्या रंगांसाठी, पोशाखांसाठी, थीमसाठी आणि पोझसाठी ओळखले जाते. (अर्थातच, तेही विचित्र वस्तूंनी भरलेले आहे.) परंतु, त्यातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही बाहुली खरेदी करणाऱ्या लोकांनाही माहीत नसते की, त्यांच्या बॉक्समध्ये त्यांना बाहुलीचा कुठला अवतार मिळणार आहे.
लाबुबूने तिच्या मालकाला चीनमधल्या टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत नेले
लाबुबू खेळण्यांच्या जबरदस्त यशाच्या मदतीने, पॉप मार्टचे सीईओ वांग निंग यांनी 2025 च्या सुरुवातीपासून सुमारे 20 अब्ज डॉलर्स कमावले आहेत. असे सांगितले जात आहे की, या बाहुलीच्या मदतीने निंगची संपत्ती तीन पटीने वाढली आहे.
लाबुबूमुळे निंग चीनच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. फोर्ब्सच्या मते, चीनच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत वांग निंग सर्वात तरुण आहे. तो आता फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 78 व्या क्रमांकावर आहे. तो पेपलचे सह-संस्थापक पीटर थिएल यांच्या पुढे आहे.
पॉप मार्टची सुरुवात अशी झाली
हाँगकाँगच्या प्रवासानंतर वांग निंग यांना पॉप मार्ट सुरू करण्याची कल्पना सुचली. त्याला LOG-ON ची प्रेरणा मिळाली, जी एक लोकप्रिय लाइफस्टाइल स्टोअर चेन आहे, जी एकाच ठिकाणी खेळणी, स्टेशनरी आणि सौंदर्यप्रसाधने विकते.
या मॉडेलपासून प्रेरित होऊन, वांगला काही काळानंतर लक्षात आले की खेळणी सर्वाधिक विकली जात आहेत. वांगने हा ट्रेंड ओळखला आणि पॉप मार्ट आता फक्त कलाकारांनी डिझाइन केलेल्या खेळण्यांवर लक्ष केंद्रित करेल, असे ठरवले आणि येथूनच ब्लाइंड बॉक्सचा प्रवास सुरू झाला. (जोपर्यंत तुम्ही बॉक्स उघडत नाही, तोपर्यंत आत काय आहे, हे कळत नाही.)
हेही वाचा - Study : पृथ्वीवरील सजीव सृष्टी सहाव्यांदा धोक्यात? यापूर्वी पाच वेळा नैसर्गिक कारणांमुळे.. पण आता..
लाबूबूची कल्पना कुठून सुचली?
वांग निंग म्हणतात की, त्यांना जपानच्या गाशापोन ऑटोमॅटिक डिस्ट्रिब्युटर्सपासून प्रेरणा मिळाली, जिथे व्हेंडिंग मशीन रंगीत कॅप्सूलमध्ये खेळणी विकतात आणि प्रत्येक कॅप्सूल एक गूढ असते आणि ग्राहकांना ते उघडल्याशिवाय आत काय आहे हे माहीत नसते. येथूनच वांगने ही कल्पना घेतली, जी खूप यशस्वी ठरली आहे. आज, या कल्पनेमुळे लाबूबू पात्रांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत झाली आहे.