Stock Market Today Updates, Sensex Nifty Share Market Today : शुक्रवारी बऱ्याच चढ-उतारांनंतर शेअरबाजार बंद झाला होता. आज सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवली. अनेक शेअर्सनी निफ्टी 50 वर बाजी मारली. टाटा मोटर्सचा शेअर 3.46 टक्के वाढीसह 715.60 रुपयांवर व्यवहार करत होता. तर, जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर 3.21 टक्के वाढीसह 1,107.60 रुपयांवर व्यवहार करत होता. एम अँड एमचा शेअर 3.11 टक्के वाढीसह 3,672.20 रुपयांवर व्यवहार करत होता. हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स 2.69 टक्के वाढीसह 5,507.00 रुपयांवर व्यवहार करत होते. तर, बजाज ऑटोचा शेअर 2.61 टक्के वाढीसह 9,321.50 रुपयांवर व्यवहार करत होते. निफ्टी 50 निर्देशांकात हे शेअर्स टॉप गेनर ठरले.
शुक्रवारी BSE SENSEX 80,710.76 वर बंद झाला होता. आज तो 80,904.40 वर उघडला. NSE Nifty50 शुक्रवारी 24,741.00 वर बंद झाला होता. तो आज 24,802.60 वर उघडला. आज TATA MOTORS, TATA STEEL, M&M, BAJAJ-AUTO आणि JSWSTEEL हे शेअर्स तेजीत होते. तर, SBILIFE, ASIAN PAINT, HDFC LIFE, BHARTI ARTL आणि TITAN हे शेअर्स पडले.
हेही वाचा - Share Market: किरकोळ गुंतवणूकदारांना होणार फायदा, अदानी पॉवर कंपनीने घेतला मोठा निर्णय
या 5 शेअर्सची आर्थिक कामगिरी
टाटा मोटर्स, जेएसडब्लू, एम अॅण्ड एम, हिरो मोटरकॉप, बजाज ऑटो हे शेअर्स सध्या चांगली कामगिरी करत आहेत. मागील पाच तिमाहींमध्ये या सर्वांनी चांगली कामगिरी करत चांगला महसूल आणि निव्वळ नफा कमवला आहे. तसेच, आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश वितरीत केले आहेत.
- टाटा मोटर्सला जून 2025 मध्ये संपलेल्या सर्वात अलीकडील तिमाहीत 1,04,407 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि 3,871 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. कंपनीने 13 मे 2025 रोजी (4 जून 2025 ला प्रभावी) भागधाराकांना प्रति शेअर 6.00 रुपये लाभांश वितरित केला आहे.
- या तिमाहीत जेएसडब्ल्यूला 43,147 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि 2,309 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. कंपनीने 23 मे 2025 रोजी (8 जुलै 2025ला प्रभावी) गंतवणुकदारांना प्रति शेअर 2.80 रुपये लाभांश दिला आहे.
- या तिमाहीत एम अँड एमला 45,529.19 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि 3,898.44 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. कंपनीने 5 मे 2025 ला लाभांश (4 जुलै 2025 ला प्रभावी) जाहीर केला. कंपनीने गंतवणुकदारांना प्रति शेअर 25.30 रुपये लाभांश दिला आहे.
- हिरो मोटोकॉर्पला या तिमाहीत 9,727.75 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आणि 1,076.21 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. कंपनीकडून 13 मे 2025 ला (24 जुलै 2025 या तारखेला प्रभावी) प्रति शेअर 65.00 रुपयांचा लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच, प्रति शेअर 100.00 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला.
- बजाज ऑटोने या तिमाहीत चांगली आर्थिक कामगिरी करत 13,133.35 कोटी रुपये महसूल आणि 2,210.44 कोटी रुपये नफा कमवला. कंपनीने 29 मे 2025 रोजी 20 जून 2025 च्या प्रभावी तारखेसह भागधाराकांना प्रति शेअर 210.00 रुपये लाभांश जाहीर केला.
हेही वाचा - DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीत सरकार 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता
[Disclaimer : ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने दिलेली आहे. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफा-तोट्यास जबाबदार नाही.)