Census 2027 Process: कोरोनामुळे 2021 साली जनगणना होऊ शकली नाही. मात्र ती जणगणना आता होत आहे. यासंदर्भातील पहिल्या टप्प्याचं काम सुरु झालं आहे. यावेळी होणारी जनगणना वेगळी ठरली आहे. कारण यात गोळ्या केल्या जाणाऱ्या माहितीमध्ये जातींसंदर्भातील माहितीही घेतली जाणार आहे. तसेच यावेळी जणगणना करताना डिजिटल माध्यमांचा वापर केला जाणार आहे. 2026-27 या काळात दोन टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी देशभरातील जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील पहिली डिजिटल जणगणना
यंदा होणार जनगणना ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरली आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अर्थात जनगणनेची जबाबदारी असणाऱ्या RGI ने प्रत्यक्ष लोकांची माहिती गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच मोबाईल फोनवर जनगणनेची माहिती गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानंतर मोबाईलमधील हा डेटा केंद्रीय सर्व्हरवर ट्रान्सफर केला जाईल. कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये खास जनगणनेसाठी तयार करण्यात आलेलं अॅप डाऊनलोड करून दिलं जाईल. या अॅपवर इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही माहिती जमा करता येणार आहे. अँड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही प्रणालींवर हे अॅप वापरता येईल.
हेही वाचा: Shashi Tharur : 'भारतानं सावध राहिलेलं बरं..'; ट्रम्पच्या धोरणांवर शशि थरूर यांचा याचं सूचक विधान
इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील सविस्तर बातमी दिली आहे. त्यानुसार जर काही कारणासत्व माहिती गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्याने मोबाईल अॅपवर माहिती न घेता कागदावर नोंद करुन घेतली. तरी त्याला नंतर वेबसाईटवर माहिती अपलोड करावी लागणार आहे. याआधी गोळा केलेली माहिती पुन्हा एकदा स्कॅन करावी लागत होती, तसेच ऑनलाईन भरावी लागत होती. मात्र आता हा प्रकार टाळता येणार आहे. नवीन पद्धतीमुळे पहिल्यांदाच प्रत्यक्ष माहिती घेण्याचं काम डिजिटल पद्धतीने केलं जाणार आहे.
जनगणनेचं काम दोन टप्प्यांत होणार
जनगणनेचं काम दोन टप्प्यांत केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर 2026 या काळात घरांबाबतची माहिती गोळा केली जाईल. त्यात घराची अवस्था, घरातील सोयी-सुविधा आणि प्रत्येक घरानिशी असणारी मालमत्ता याबाबतच्या माहितीचा समावेश आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून त्यात प्रत्यक्ष व्यक्तींची माहिती गोळा केली जाईल. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये वगळता इतर ठिकाणी याच पद्धतीने जनगणना होईल. या राज्यांमध्ये सप्टेंबर 2026 मध्ये जनगणनेचं काम केलं जाईल.
हेही वाचा: Pitru Paksha 2025 : या राज्यात स्वतःसाठी केलं जात पिंडदान; जाणून घ्या कोणत्या मंदिराजवळ होते ही विधी
यावेळी पहिल्यांदाच नागरिकांना स्वयंगणनेची (Self Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात नागरिकांना जनगणनेची माहिती गोळा करून घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. ते स्वत:च संबंधित संकेतस्थळावर जनगणनेसंदर्भातील माहिती भरू शकतात.
प्रत्येक इमारतीचं जिओ-टॅगिंग
डिजिटल माहिती आणि स्वयंगणनेसोबतच यंदा जनगणनेदरम्यान Geo Tagging च्या सुविधेचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक इमारतीला जिओ टॅग केलं जाणार आहे. यासाठी डिजिटल लेआऊट मॅपिंग (DLM) आणि हाऊसलिस्टिंग ब्लॉक्स (HLB) यांची मदत घेतली जाईल.