मुंबई: मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यातील सर्वश्रृत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्टला मुंबईला आंदोलनासाठी निघणार आहेत.गणेशोत्सवादरम्यान मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. यावर आता लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला उरावर बसून आरक्षण घ्यायचय? असा सवाल यावेळी हाकेंनी जरांगेना केला आहे.
झुंड घेऊन मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवणं, ट्रॅफिक करणं, ठाण मांडून बसणं, काय साध्य करायचं आहे तुम्हाला असा सवाल हाके यांनी जरांगे पाटील यांना केला आहे. तसेच तुम्हाला उरावर बसून आरक्षण घ्यायचं आहे का? तुमच्यात एवढी धमक आहे तर आरक्षण कशाला मागता अशी टीका हाकेंनी केली आहे. मुख्यमंत्री टार्गेट होत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार टाळ्या वाजवत आहेत. त्यांना गुदगुल्या होत आहेत. याच उत्तर आम्हाला कळालेलं नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.
हेही वाचा: Manoj Jarange VS Nitesh Rane: फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द वापरले तर जीभ हासडून देऊ; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
मला जाळावं याची.....
आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळला. होता यावर बोलताना, मी तिकडे चाललो आहे. त्यांनी यावं आणि मला जाळावं. आम्ही याची वाट बघतं आहोत. ओबीसी आरक्षणासाठी कोण मला जाळतं असेल तर मी तयार आहे असेही हाकेंनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक
बीड जिल्ह्यातील गेवराईत लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली. हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. याप्रकरणी हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . या पाश्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली. गेवराईतील राडा प्रकरणात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह दोन्ही गटातील 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेवराई शहरातील मुख्य चौकात घोषणाबाजी झाली होती. आमदार विजयसिंह पंडित समर्थकांकडून हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती.