मुंबई: यूएसव्ही फार्मास्युटिकल्सच्या अध्यक्षा लीना तिवारी यांनी मुंबईत प्रॉपर्टी डील करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी मुंबईतील वरळी येथे समुद्रासमोर असलेले दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट 639 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे या प्रॉपर्टी डीलसाठी त्यांनी 63.9 कोटी रुपयांचा स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी भरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रॉपर्टी डीलने भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, कार्पेट आधारावर फ्लॅटची किंमत प्रति चौरस फूट 2.83 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीची रक्कम जोडल्यानंतर, त्यांनी या दोन्ही फ्लॅटसाठी सुमारे 703 कोटी रुपये दिले आहेत.
ही मालमत्ता सुमारे 22,572 चौरस फूट पसरलेली असून ती वरळीमध्ये एका प्रीमियम लोकेशनमध्ये आहे. 40 मजली इमारतीच्या 32 व्या मजल्यापासून 35 व्या मजल्यापर्यंतचे दोन अल्ट्रा लक्झरी युनिट्स प्रति चौरस फूट 2.83 लाख रुपये दराने खरेदी करण्यात आले आहेत. लीनाने या घरासाठी 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले आहेत, म्हणजेच एकूण खर्च 703 कोटी रुपये झाला आहे. मुंबईतील वरळी हे ठिकाण देशातील श्रीमंत लोकांची खास पसंती आहे.
हेही वाचा - एलोन मस्क यांनी आठवड्यातून किमान 40 तास काम करावे; टेस्ला गुंतवणूकदारांचे कंपनीच्या मंडळाला पत्र
लीना तिवारी यांची एकूण मालमत्ता -
फोर्ब्सच्या मते, लीना तिवारी यांची एकूण मालमत्ता 3.9 अब्ज डॉलर्स आहे. लीना या मुंबईस्थित औषध कंपनी USV च्या अध्यक्षा आहेत, जिथे ग्लायकोमेंट, इकोस्पिन आणि रोझडे सारख्या मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधे तयार केली जातात.
हेही वाचा - D Mart साहित्य स्वस्त मिळतं.. पण एका शेअरची किंमत आहे हजारांमध्ये! कशी केली इतकी प्रगती?
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नाव -
फोर्ब्सच्या यादीनुसार, लीना तिवारी भारतातील सहाव्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महिला असण्यासोबतच, लीना तिवारी या सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी एक आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये, त्यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 24 कोटी रुपये दान केले. लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी हे आयआयटी आणि कॉर्नेल पदवीधर असून ते USV कंपनीच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतात.