मुंबई: श्रावण हा महिना सर्व अर्थाने खास असतो. शिवभक्तांसाठी हा महिना एखाद्या सण किंवा उत्सवापेक्षा कमी नसतो. असे मानले जाते की, भगवान शंकराला मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. आज श्रावण शिवरात्री आहे. त्यामुळे देशभरातील सगळ्या मंदिरात गर्दी असणार आहे. शंकराच्या पूजेच्या वेळी एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे नंदीच्या कानात बोलणे होय. कधी विचार केला आहे का की नंदीच्या कोणत्या कानात बोलल्यावर इच्छा लवकर पूर्ण होते? जर नसेल माहिती तर नंदीच्या उजव्या की डाव्या कानात बोलले पाहिजे? जाणून घेऊयात...
नंदीच्या 'या' कानात बोला तुमची इच्छा
आज श्रावण शिवरात्रीच्या मुहूर्तावर शिवभक्त शंकराला जलाभिषेक करतील. तसेच शिवलिंगावर शंकराच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातील. शिवभक्त शिवलिंगावर बेलपत्र आणि दही-दूध अर्पण करुन पूजा केली जाईल. असे मानले जाते की श्रावण नवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानात आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे. नंदी शंकराचे वाहनच नाहीत तर ते त्यांना सर्वात प्रिय आहेत. नंदीच्या कानात बोललेली इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोहोचते, असे म्हटले जाते.
हेही वाचा: Sambhajinagar: ऐन पावसाळ्यात 79 टँकर सुरू; अजूनही 49 गावांना टंचाईच्या झळा
शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीच्या जवळ जाऊन आपल्या मनातील इच्छा बोला. यावेळी हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची इच्छा नंदीच्या उजव्या कानात सांगायची आहे. दरम्यान एका हाताने नंदीचा डावा कान झाका आणि उजव्या कानात तुमची इच्छा सांगा. यानंतर नंदीचे दर्शन घ्या. शक्य असल्यास, थोडा वेळ नंदीजवळ बसा आणि शिवलिंगाकडे शांतपणे पाहा.