Friday, September 12, 2025 12:26:46 PM

Adani Investment in Maharashtra : अदानी समुहाची 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ; राज्यातील 'या' विभागाला होणार फायदा

अदानी इंटरप्रायजेसने कोळसा उद्योगासाठी 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले आहे.

adani investment in maharashtra  अदानी समुहाची  70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक  राज्यातील या विभागाला होणार फायदा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योगविश्वाबद्दल एक महत्त्वाची  माहिती सांगितली आहे. राज्यात 1 लाख 8 हजार कोटींची नवी गुंतवणूक होणार असून यामुळे 30 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात अदानी इंटरप्रायजेसने कोळसा उद्योगासाठी 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे सांगितले आहे. 

त्याचप्रमाणे काटोलमध्ये रिलायन्सचाही 9913 कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. विदर्भात विविध उद्योग, प्रकल्प उभारण्यासाठी अदानी समूहाकडून गुंतवणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 
काटोल तालुक्यातील मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्कमध्ये अदानी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडकडून 1151 कोटींचा प्रकल्प उभारणार आहेत. विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठी हा टप्पा ऐतिहासिक ठरेल.  लॉजिस्टिक, उर्जा, कोळसा, खाणकाम, पायाभूत सुविधा यासह विविध क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री