महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ आलेल्या असतानाच महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाला धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील प्रकाश महाजन यांनी पक्षाला राम राम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच ते पक्षामध्ये होते. मराठवाड्यातील मनसेचा प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मनसेचा ते बुलंद आवाज होते. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.