Wednesday, August 20, 2025 01:20:42 PM

'शशिकांत शिंदेचं मन विरोधी बाकावर रमत नाही'

शशिकांत शिंदे यांचा सारखा नेता अजित पवार यांची भेट उगाचच घेत नाही.

शशिकांत शिंदेचं मन विरोधी बाकावर रमत नाही

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राजकीय घडामोडींवर महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला करत म्हटले की, शशिकांत शिंदे यांचा सारखा नेता अजित पवार यांची भेट उगाचच घेत नाही. शशिकांत शिंदे यांचे विरोधी बाकावर मन रमत नाही आणि त्यांनी ते अनेकदा आम्हाला सांगितले आहेत, असे ते म्हणाले.

जोडे मारणाऱ्यांना सोडणार नाही
माझ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत आम्ही लवकरच उपाय शोधणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. याबरोबरच, त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा कडक इशाराही दिला. मिटकरी यांनी सांगितले की, या प्रकाराला वाव देणे अजिबात योग्य नाही आणि अशा वागणुकीला तडीस जाऊन कडक कारवाई केली जाईल.

शशिकांत शिंदे यांचे विरोधी बाकावर मन रमत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शशिकांत शिंदे यांच्या राजकीय वागणुकीवर टीका केली आहे. शिंदे यांचा सारखा नेता उगाचच अजित पवार यांची भेट घेत नाही, असा दावा मिटकरी यांनी केला. शशिकांत शिंदे यांचे विरोधी बाकावर मन रमत नाही, असे ते अनेक वेळा आम्हाला म्हणाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांच्या आरोपावरून मिटकरी यांनी शशिकांत शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, अजित पवार यांच्या प्रकृतीविषयीही त्यांनी माहिती दिली. पवार यांना घशाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे ते आजपर्यंत कामकाजात सहभागी होऊ शकले नव्हते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता, परंतु आज ते कार्यकमांत सहभागी होणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री