Friday, September 05, 2025 04:22:42 AM

'नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देऊ नये'

नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देणे टाळा... अशा स्वरुपाचं आवाहन विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रौत्सव मंडळांना केलं आहे.

नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देऊ नये

मुंबई : यंदाच्या नवरात्रौत्सवाला गुरुवारी घटस्थापनेनं सुरुवात होईल. मुंबई - ठाण्यात नवरात्रौत्सवानिमित्त दांडियाचं आयोजन केलं जातं. या दांडियाला तुफान गर्दी होते. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रौत्सव मंडळांना आवाहन केलं आहे. लव्ह जिहादचं संकट टाळण्यासाठी खबरदारी घ्या... नवरात्रौत्सवात मुसलमानांना प्रवेश देणे टाळा... अशा स्वरुपाचं आवाहन विश्व हिंदू परिषदेने राज्यातील नवरात्रौत्सव मंडळांना केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनाचं हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केलं आहे.


सम्बन्धित सामग्री