Thursday, September 18, 2025 02:24:04 PM

Looking For Indian Husband : 'भारतीय नवराच हवा'; न्यूयॉर्कच्या 'टाईम्स स्क्वेअर'वर तरुणीची अनोखी जाहिरात

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी हातात एक मोठा प्लेकार्ड घेऊन उभी आहे. या प्लेकार्डवर स्पष्टपणे लिहिलेले आहे, 'Looking for Indian Husband'!

looking for indian husband  भारतीय नवराच हवा न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर तरुणीची अनोखी जाहिरात

Looking For Indian Husband : आपला जीवनसाथी (Life Partner) शोधण्यासाठी लोक डेटिंग ॲप्स, मॅट्रिमोनियल साईट्स आणि सोशल मीडियाचा वापर करतात. पण जेव्हा या सर्व मार्गांनी निराशा हाती येते, तेव्हा काही लोक असे अनोखे उपाय शोधतात की, ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो आणि हसूही येते.. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणीने आपला जोडीदार शोधण्यासाठी थेट न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर गाठले आहे.

'भारतीय नवरा हवा आहे'
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी हातात एक मोठा प्लेकार्ड घेऊन उभी आहे. या प्लेकार्डवर स्पष्टपणे लिहिलेले आहे, 'Looking for Indian Husband' (भारतीय नवरा हवा आहे). तिची ही अनोखी जाहिरात पाहून लोक थक्क झाले आणि काही क्षणातच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

स्पायडरमॅनची एन्ट्री
लोक तिच्या या धाडसाचे आणि अनोख्या मार्गाचे कौतुक करत असतानाच, एक गंमत घडली. अचानक स्पायडरमॅनच्या वेशात असलेला एक व्यक्ती तिच्या दिशेने आला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा मजेशीर प्रसंग पाहून उपस्थितांनी लगेचच कॅमेऱ्यात कैद केला आणि हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला.

पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Sachin Tendulkar's Plane Emergency Landing : वादळामुळे सचिन तेंडुलकर अडकला आफ्रिकेच्या घनदाट जंगलात! पाहा Video

चर्चेला उधाण, कोणत्या कारणामुळे भारतीय पतीची मागणी?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या तरुणीबद्दल चर्चा सुरू झाली. ती नक्की कोण आहे, हे अजून समोर आले नाही. पण, तिला भारतीय पतीच का हवा आहे, यावर अनेक युजर्सनी आपापली मते मांडली.
- कौटुंबिक आणि पारंपरिक मूल्ये: काही युजर्सच्या मते, भारतीय पुरुष कुटुंब आणि परंपरांना जास्त महत्त्व देतात, म्हणूनच कदाचित तिला भारतीय पती हवा असावा.
- शाहरुख खान जबाबदार: एका युजरने गंमतीने लिहिले, "तिच्या या स्वप्नासाठी फक्त शाहरुख खानचे चित्रपट जबाबदार आहेत."
- चांगली चहा आणि उत्तम पती: दुसऱ्या एका युजरने म्हटले, "तिला माहीत आहे की भारतीय पुरुष उत्तम चहा बनवतात आणि त्याहूनही चांगले पती असतात."
- बॉलिवूड आणि क्रिकेटचा प्रभाव: काही जणांनी सांगितले की, बॉलिवूड, क्रिकेट आणि भारतीय जेवणाने तिला प्रभावित केले असावे.
पण, या गमतीशीर चर्चेत काही युजर्सनी वास्तववादी मतही मांडले. एकाने लिहिले की, "जगातील सर्व पुरुष लग्नानंतर एकाच प्रकारचे होतात."

हेही वाचा - Raj Thackeray : 'नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं?'; भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यावरून शाह पिता-पुत्रावर राज ठाकरेंची मार्मिक टीका


सम्बन्धित सामग्री